22 November 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Salary Management | कमी पगार असून सुद्धा बनाल श्रीमंत, या जबरदस्त टिप्स वापरा आणि जास्त पैशांची बचत करा - Marathi News

Highlights:

  • Salary Management
  • 1) कर्जमुक्त होण्याकडे लक्ष द्या :
  • 2) घर खर्चाच्या या गोष्टी लक्षात ठेवा :
  • 3) कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे :
  • 4) स्वतःला बचतीचे व्यसन लावून घ्या :
  • 5) महागड्या वस्तूंवर पैसे खर्च करू नका :
Salary Management

Salary Management | प्रत्येक व्यक्तीला भविष्यामध्ये आर्थिक स्थैर्यता हवी असते. आपल्या भविष्य उज्वल आणि प्रखर असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. यासाठी बरेचजण नोकरीला असतानाच गुंतवणुकीचे पर्याय शोधतात. काही व्यक्तींना तर, लहानपणापासूनच पैशांची बचत करण्याची सवय असते. पैशांची बचत करणे हा मार्ग तुम्हाला कमी वेळात श्रीमंतीच्या मार्गाकडे घेऊन जाऊ शकतो.

काही दिवसांआधी एक बातमी चांगलीच वायरल होत होती. या बातमीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, केवळ 30 व्या वर्षी एका महिलेने सेवानिवृत्ती घेतली. तिने नोकरीला लागल्याबरोबर आर्थिक मोजमापाचे नियोजन केले होते. त्यामुळे काहीच वर्षांत ती आत्मनिर्भर झाली आणि स्वतःच्या पायावर पूर्णपणे उभी राहिली. आता या सर्वांचं मूळ म्हणजे बचत.

आपल्या सर्वसामान्य कुटुंबांमध्ये सर्वसामान्य व्यक्ती जर कमी पगाराची नोकरी करत असेल तर तो बचतीला जास्त महत्व देत नाही. किंवा पगार कमी आहे मग बचत कशातून करणार अशा पद्धतीची कारणं देखील देतो. परंतु आता चिंता करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही आम्ही सांगितलेल्या या खास टिप्स वापरून कमी पैशांतही श्रीमंत बनू शकता.

1) कर्जमुक्त होण्याकडे लक्ष द्या :
जर तुम्ही काही कारणास्तव कर्ज घेतले असेल तर, सर्वातआधी कर्ज फेडण्याला प्राधान्य द्या. कारण की, कर्जामध्येच तुमची बचतीची रक्कम निघून जात असते. त्यामुळे तुमच्याजवळ केवळ गरजेपुरताच पैसा शिल्लक राहतो. जेवढ्या लवकर तुमच्या डोक्यावरचा भार हलका कराल तितक्या लवकर तुम्ही बचतीकडे वाटचाल करू शकाल.

2) घर खर्चाच्या या गोष्टी लक्षात ठेवा :
कमी पगारातून घर खर्च चालून सुद्धा पैशांची बचत करता येऊ शकते. यासाठी तुम्ही पैसे बचतीचे वेगवेगळे मार्ग शोधायला हवे. समजा तुम्ही अविवाहित आहात आणि तुम्ही एकटेच खोली घेऊन भाड्याने राहत आहात तर, पैशांची बचत करण्यासाठी तुम्ही एखादा रूममेट शोधून दोघंही अर्ध भाडं भरून पैसे वाचवू शकता. त्याचबरोबर तुमचं चार जणांचं कुटुंब असेल तर तुम्ही वन बीएचके ऐवजी वन रूम किचनमध्ये देखील आरामात राहू शकता. यामुळे तुम्हाला कमी घर भाडं भरावा लागेल. जेणेकरून तुमचे पैसे वाचतील.

3) कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे :
समजा तुम्ही कुटुंबप्रमुख आहात आणि संपूर्ण घर तुमच्यावरच अवलंबून आहे. अशावेळी तुम्ही कोणताही विचार न करता आयुर्विमा म्हणजेचं टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. अशावेळी अचानक तुमचा मृत्यू झाला तर, तुमच्या कुटुंबाला भविष्यामध्ये कोणतीही चणचण भासणार नाही. कारण की, टर्म इन्शुरन्सचे प्लॅन प्रीमियम प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला परवडण्यासारखे असतात. त्यामुळे पैशांच्या बचतीमध्ये हा एक मार्ग देखील तुमची भरपूर मदत करू शकतो.

4) स्वतःला बचतीचे व्यसन लावून घ्या :
असं म्हणतात की, एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले की ते सहजासहजी सुटत नाही. आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि आपण ती सातत्याने करतो तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं व्यसन लागत जातं आणि आपण ती गोष्ट कायमस्वरूपी करत राहतो. याच गोष्टीला व्यसन असे म्हणतात. तुम्ही तुमच्या अंगी पैशांच्या बचतीचे व्यसन लावून घेतले पाहिजे. तुमच्या महिन्याच्या पगारातून घरातील किराणा बाजार आणि लाईट बिलपासूनचा इतर खर्च कॅल्क्युलेट करून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम बाजूला काढून ठेवली पाहिजे. त्यानंतर उर्वरित रक्कम एखाद्या सुरक्षित आणि जास्त व्याजदर मिळवून देणाऱ्या योजनेत गुंतवले पाहिजेत. उरलेले पैसे तुम्ही सोन्यामध्ये देखील गुंतवू शकता. जर तुम्ही उरलेले पैसे गुंतवले नाही तर, तुमच्याकडून ते खर्च होण्याची शक्यता असते. परंतु, तुम्ही एकदा बचतीची सवय लावली किंवा एखाद्या योजनेमध्ये पैसे गुंतवले तर, तुमचे पैसे लॉन्ग टर्मसाठी साठत राहतील त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्की होईल.

5) महागड्या वस्तूंवर पैसे खर्च करू नका :
जर तुम्ही महागड्या वस्तूंवर पैसे खर्च न करून साध्या वस्तूंवर पैसे खर्च करून ऍडजस्टमेंटमध्ये राहणं शिकलात तर, तुमचे वायफळ पैसे खर्च होण्यापासून वाचतील. कमी पैशांत बजेट ठरवल्यामुळे तुम्हाला जास्त उधळपट्टी करण्याची सवय लागत नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा बजेट करणे अत्यंत गरजेचे आहे.

Latest Marathi News | Salary Management 27 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Salary Management(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x