28 September 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | स्वतःच्या नव्हे तर पत्नीच्या नावावर करा FD सुरू, मिळतील आश्चर्यकारक फायदे - Marathi News Infosys Vs NTPC Share Price | इन्फोसिस आणि NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Bigg Boss Marathi | 'हे अरबाजचे कपडे आहेत फेकून द्या', निक्कीला मिळाला गुलिगत धोका, आई म्हणाली.. - Marathi News SJVN Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News BEL Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट, शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी ओव्हरवेट रेटिंग, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Tata Steel Share PriceNSE: TATASTEEL – टाटा स्टील कंपनी अंश
  • ESAF स्मॉल फायनान्स बँकेसोबत करार
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग – TATA STEEL SHARE
Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील आणि टाटा मोटर्स कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. सध्या टाटा स्टील कंपनीच्या (NSE: TATASTEEL) शेअर्समध्ये मागील काही काळापासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. नुकताच टाटा स्टील कंपनीने ओडिशा राज्यात कलिंगनगर प्लांटमध्ये भारतातील सर्वात मोठी ब्लास्ट फर्नेस सुरू केली आहे. या प्लांटची उत्पादन क्षमता वार्षिक 3 दशलक्ष टनवरून वाढून 8 दशलक्ष टनपर्यंत पोहचली आहे. (टाटा स्टील कंपनी अंश)

शुक्रवारी टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.65 टक्क्यांच्या वाढीसह 168.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसभरात या कंपनीचे 262.26 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,10,122.73 कोटी रुपये आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.31 टक्के वाढीसह 166.13 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

ESAF स्मॉल फायनान्स बँकेसोबत करार
मागील एका आठवड्यात टाटा मोटर्स कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहन ग्राहकांना वित्तपुरवठा सेवा ऑफर करण्यासाठी ESAF स्मॉल फायनान्स बँकेसोबत करार केला आहे. टाटा मोटर्स कंपनीने मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात 78,010 युनिट विक्री केली होती. तर या वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीच्या एकूण घाऊक विक्रीत 8 टक्क्यांची घसरण झाली आहे. या कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, या महिन्यात टाटा मोटर्स कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री 70,006 युनिट्स झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 76,261 युनिट्स विक्री केली होती.

टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी किंचित वाढीसह 996 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दरम्यान दिवसभरात या कंपनीचे 43.90 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. टाटा मोटर्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,65,861.48 कोटी रुपये आहे.

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 1050 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 970 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.33 टक्के घसरणीसह 989.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x