21 November 2024 7:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

Big Breaking | इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Big Breaking

FM Nirmala Sitharaman | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून पैसे उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बेंगळुरूयेथील विशेष लोकअदालतीने या तक्रारीवर सुनावणी करताना अर्थमंत्री आणि इतर अनेक नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जनाधिकार संघर्ष परिषदेचे सहअध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरूयेथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात केली होती. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून धमकावून खंडणी केली जात असल्याची तक्रार त्यांनी केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बेंगळुरूच्या टिळकनगर पोलिस स्टेशनला इलेक्टोरल बॉण्डद्वारे खंडणी प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. एसीएमएम कोर्टाने तक्रारीची प्रत आणि रेकॉर्डची प्रत पोलिस ठाण्यात पाठविण्याचे आदेश दिले. एफआयआर प्रलंबित असल्याने सुनावणी १० तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

न्यायालयाने टिळकनगर पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जे पी नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, भाजप नेते नलिन कुमार कटील, केंद्रीय आणि राज्य भाजप कार्यालये आणि ईडी विभागाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एप्रिल २०१९ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या कंपनीकडून सुमारे २३० कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मसीकडून ४९ कोटी रुपये इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून गोळा करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Latest Marathi News | Big Breaking Bengaluru Special Court Orders FIR Against Union Finance Minster Nirmala Sitharaman 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BIG BREAKING(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x