1 October 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | नोकरदारांनो, EPF मधून पैसे काढून गृहकर्ज फेडत असाल तर सावधान, आधी या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI फंडाच्या या योजनेत पैसा वाढवा, बचतीवर 5 वर्षात मिळेल करोडोत परतावा - Marathi News Reliance Infra Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, 1 महिन्यात दिला 54% परतावा दिला, फायदा घ्या - Marathi News NMDC Share Price | NMDC सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News Penny Stocks | 4 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 36% परतावा दिला, यापूर्वी 2200% परतावा दिला - Marathi News Vodafone Idea Share Price | Vodafone Idea सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, रेटिंग सह टार्गेट प्राईज नोट करा - Marathi News EPFO Pension | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, मिळणार दरमहा 10,050 रुपये पेन्शन - Marathi News
x

Bigg Boss Season 5 | भाऊचा धक्का, बिग बॉस सोडून रितेश परदेशात, पत्नी जीनिलियाने शेअर केला 'तो' व्हिडिओ - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Marathi
  • सुंदर कॅप्शनसह जीनिलियाने शेअर केला रितेशचा व्हिडिओ :
  • कोण होणार महाविजेता :
Bigg Boss Marathi

Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉसच्या पाचव्या सिझनला प्रेक्षकांकडून चांगलाच वाव मिळत असल्याचा पाहायला मिळतोय. दरम्यान हा शो आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या 6 ऑक्टोबरला महाअंतिम सोहळा पार पडणार असून बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार हे सर्वांनाच कळणार आहे. परंतु गेल्या दोन आठवड्यांपासून प्रेक्षक घरी बसून ज्या दिवसाची वाट पाहतात तो दिवस म्हणजे भाऊचा धक्का. जो शनिवार आणि रविवारी पार पडत असतो.

परंतु रितेशने दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर अनुपस्थिती दाखवली. यादरम्यानच्या अनेक अफवा आणि चर्चांना सोशल मीडियावर उधान आलं होतं. रितेशने बिग बॉस शो सोडला की काय असे प्रश्न अनेकांना पडत होते. परंतु बिग बॉस यांनी खुलासा करत रितेश थेट 6 ऑक्टोंबरला महाअंतिम सोहळ्याला उपस्थिती दर्शवणार आहेत अशी घोषणा केली. तरी सुद्धा रितेश नेमका कुठे आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. दरम्यान पत्नी जीनिलियाने प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. तिने रितेश आणि तिच्या मुलांचा परदेशामधील एक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे.

सुंदर कॅप्शनसह जीनिलियाने शेअर केला रितेशचा व्हिडिओ :

रितेशची पत्नी जेनिलियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रितेश त्याच्या दोन्ही मुलांबरोबर राहील आणि रियान यांच्याबरोबर परदेशात फिरत असल्याचा दिसत आहे. फिरत असताना तिघांनीही निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलं आहे. व्हिडिओमध्ये रितेश आणि त्याची दोन मुलं रस्त्यावरून फेरफटका मारत असताना गंमत आणि मस्ती करत आपल्या वडिलांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. या होमली व्हिडिओला जेनेलियाने कॅप्शन लिहिलंय की,”जेव्हा ते 20 दिवसांनी बाबांना भेटतात तेव्हा आई पूर्णपणे विसरली जाते आणि फोटो/व्हिडिओ काढण्यापुरती मर्यादित असते”. असं क्युट रिएक्शन असणारं कॅप्शन जिनिलियाने दिल आहे.

कोण होणार महाविजेता :
दरम्यान फिनाले पिरियड सुरू असताना. कोणत्या सदस्याला सर्वात जास्त वोटिंग मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. काहींना वाटतंय की, अभिजीत सावंत बिग बॉसची ट्रॉफी उचलणार तर, काहींना वाटतय की, सुरज चव्हाणच बिग बॉसच्या ट्रॉफीचा मानकरी होणार. परंतु ही धुरा सदस्यांच्या नाही तर प्रेक्षकांच्या हाती आहे. सदस्याला सर्वात जास्त वोटिंग मिळणार तोच बिग बॉसच्या घराची ट्रॉफी उचलणार. दरम्यान उरलेल्या या एका आठवड्यात बिग बॉस सदस्यांसमोर कोणकोणते नवनवीन टास्क समोर आणून ठेवणार याकडे देखील अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Update 30 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Marathi(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x