1 October 2024 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs RVNL Share Price | IRFC आणि RVNL शेअर्स मालामाल करणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, ट्रेनमध्ये अशी मिळवता येईल लोअर बर्थ सीट, बुकिंगबद्दल लक्षात घ्या या गोष्टी - Marathi News Bigg Boss Marathi | अखरे निक्कीने पटकावलं शेवटच्या आठवड्यातील तिकीट टू फिनाले, नेटकऱ्यांच्या कमेंट - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकने ब्रेकआऊट दिला, टार्गेट प्राईस नोट करा, यापूर्वी 370% परतावा दिला - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी 2 विजेता शिव ठाकरेची एन्ट्री, नव्या ट्विस्टकडे सर्वांचं लक्ष - Marathi News
x

My EPF Money | नोकरदारांनो, EPF मधून पैसे काढून गृहकर्ज फेडत असाल तर सावधान, आधी या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News

My EPF Money

My EPF Money | घराची स्वप्नपूर्ती साकारण्यासाठी अनेक लोक होम लोन घेऊन भला मोठा हप्ता फेडतात. प्रत्येक महिन्याला होम लोन फेडत असल्यामुळे मिळणाऱ्या वेतनातील तुमची एक मोठी रक्कम होम लोनसाठी बाजूला निघते. अशावेळी अनेक व्यक्ती ईपीएफओच्या मिळणाऱ्या पैशांतून होम लोन फेडण्याच्या तरतुदी करून घेतात. तुम्हाला सुद्धा ईपीएफओच्या पैशांतूनच होम लोन कर्ज फेडायचं असेल तर, काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग पाहूया नेमका कोणत्या गोष्टी आहेत.

ईपीएफच्या पैशांतून होम लोन फेडण्याचा विचार करत असाल तर, या गोष्टींची काळजी घ्या :

1) ईपीएफमध्ये जमा होणारे रक्कम तुमच्या भविष्यासाठीची जमा केलेली रक्कम असते. त्यामुळे ईपीएफमधून कधीही पूर्ण रक्कम काढून घेऊ नका. नाहीतर रिटायरमेंटपर्यंत तुमच्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही.

2) तुम्हाला ईपीएफच्या पैशांतून गृहकर्ज फेडायचं असेल तर, सर्वप्रथम हे लक्षात घ्या की तुम्हाला एकूण किती पैशांची गरज आहे. पैशांचं व्यवस्थित कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला ईपीएफच्या पैशांच नियोजन करण्यास सोपं जाईल.

3) ईपीएफ ही योजना अधिक व्याजदरासाठी ओळखली जाते. जर तुम्ही जास्त व्याजामुळे होम लोन फेडण्यासाठी विचार करत असाल तर, तुम्हाला तुमचं अकाउंट बॅलन्स ट्रान्सफर करण्याचा विचार करावा लागेल.

4) तुम्ही ईपीएफमधून गृहकर्ज फेडण्याचा विचार करत असाल तर, लागू होणाऱ्या टॅक्स दरांविषयी देखील माहिती करून घ्या. कारण की तुम्हाला त्याच ते पेमेंट करावे लागण्याची शक्यता घासू शकते.

5) तुम्ही पूर्णपणे होम लोन फेडलं असेल तर, बँकेकडून घराची सर्व प्रकारची कागदपत्रे घेऊन या. त्याचबरोबर तुम्ही घराजवळ पूर्णपणे फेडलं आहे अशा पद्धतीची लिखित एनओसी बँकेकडून मागून घ्या. असं केल्याने तुमचा व्यवहार क्लियर राहण्यात मदत होईल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

Latest Marathi News | My EPF Money 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#My EPF Money(127)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x