1 October 2024 2:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs RVNL Share Price | IRFC आणि RVNL शेअर्स मालामाल करणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Post Office Scheme | महिलांनो, 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर केवळ व्याजानेच कमवाल 32,044 रुपये, फायदा घ्या - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, ट्रेनमध्ये अशी मिळवता येईल लोअर बर्थ सीट, बुकिंगबद्दल लक्षात घ्या या गोष्टी - Marathi News Bigg Boss Marathi | अखरे निक्कीने पटकावलं शेवटच्या आठवड्यातील तिकीट टू फिनाले, नेटकऱ्यांच्या कमेंट - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील स्टॉकने ब्रेकआऊट दिला, टार्गेट प्राईस नोट करा, यापूर्वी 370% परतावा दिला - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठी 2 विजेता शिव ठाकरेची एन्ट्री, नव्या ट्विस्टकडे सर्वांचं लक्ष - Marathi News
x

SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI फंडाच्या या योजनेत पैसा वाढवा, बचतीवर 5 वर्षात मिळेल करोडोत परतावा - Marathi News

Highlights:

  • SBI Mutual Fund
  • SBI PSU इक्विटी फंड
  • SBI इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड
  • एसबीआय कॉन्ट्रा फंड
  • एसबीआय मिडकॅप म्युच्युअल फंड
SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआयच्या पीएसयू, इन्फ्रास्ट्रक्चर, कॉन्ट्रा आणि मिड-कॅप फंडांनी मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. SBI PSU सारख्या म्युच्युअल फंडांनी अवघ्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तीन पट वाढवले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या योजनांमध्ये मासिक 20000 रुपये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता अनेक पट वाढले आहेत. आज या लेखात आपण एसबीआयच्या 4 सेक्टरल म्युच्युअल फंड योजनाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

SBI PSU इक्विटी फंड :
या म्युच्युअल फंडने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 42.48 टक्के SIP रिटर्न दिला आहे. SBI PSU म्युच्युअल फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) 3,071 कोटी रुपये आहे. या योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य 36.21 कोटी रुपये आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या योजनेमध्ये मासिक 20000 रुपये एसआयपी गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पाच वर्षात 33.50 लाख रुपये झाले आहे. या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये एसबीआय, पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि कोल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

SBI इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड :
या म्युच्युअल फंड योजनेने पाच वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना एसआयपी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 37.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेचे AUM 3,088 कोटी रुपये आणि NAV 55.72 रुपये आहे. जा गुंतवणूकदारांनी या म्युच्युअल फंड योजनेमध्ये मासिक 20000 रुपये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पाच वर्षात 30.02 लाख रुपये झाले आहे. या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, भारती एअरटेल, एल अँड टी आणि कार्बोरंडम युनिव्हर्सल लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

एसबीआय कॉन्ट्रा फंड :
या म्युच्युअल फंडने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना एसआयपी गुंतवणुकीवर 54 टक्के परतावा दिला आहे. या योजनेचा AUM 30,520 कोटी रुपये आणि NAV 401.08 रुपये आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या म्युच्युअल फंड योजनेमध्ये मासिक 20000 रुपये एसआयपी गुंतवणूक केली होती त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पाच वर्षात 29.13 लाख रुपये झाले आहे. या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये निफ्टी बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय आणि गेल (इंडिया) कंपनीचे शेअर्स आहेत.

एसबीआय मिडकॅप म्युच्युअल फंड :
या म्युच्युअल फंड योजनेने मागील पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 33.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. या योजनेचा AUM 18,399 कोटी रुपये आणि NAV 259.8 कोटी रुपये आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या म्युच्युअल फंड योजनेमध्ये मासिक 20000 रुपये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य पाच वर्षात 27.07 लाख रुपये झाले आहे. या म्युच्युअल फंड योजनेच्या पोर्टफोलिओमध्ये टोरेंट पॉवर, शेफलर इंडिया, थर्मॅक्स लिमिटेड आणि सुंदरम फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x