21 November 2024 11:15 PM
अँप डाउनलोड

जळगाव पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण?
प्रश्न
2
१९०७ साली जगातील साम्यवादीच्या परिषदेत मादाम कामा यांनी जो तिरंगा फडकवला, त्यावर कोणती चिन्हे होती?
प्रश्न
3
एका त्रिकोणाचे दोन कोण ६०अंश व ९० अंश अशी आहेत तर त्या त्रिकोणाचा तिसरा कोन किती अंशाचा असेल?
प्रश्न
4
” ते गाणे गातात,” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
5
किमान किती सदस्यांच्या पाठींब्याने राज्यसभेने ठराव संमत केल्यास संसद राष्ट्रहिताच्या दृष्टीने राज्यसुचीमधील विषयासंबधी कायदे करू शकते?
प्रश्न
6
केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंधासंदर्भातील बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत?
प्रश्न
7
एका सांकेतिक भाषेत REFRIGERATOR हा शब्द ROTAREGIRFER असा लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेत कोणता शब्द NOITINUMMA असा लिहिला जाईल?
प्रश्न
8
सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता?
प्रश्न
9
कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो?
प्रश्न
10
मानवी शरीरात रक्ताचे कार्य कोणते? अ) शरीराच्या प्रत्येक भागस प्राणवायू पुरविणे ब) शरीराच्या प्रत्येक भागास उर्जा पुरविणे क) शरीरावर झालेल्या जखमेबाबत सूचित करणे ड) पांढऱ्या पेशीच्या मदतीने रोगकारक जंतूचा नाश करणे.
प्रश्न
11
मुंबई – मेट्रोची सुरुवात या दिवशी झाली?
प्रश्न
12
एक फ्रिज ८१०० रु. विकल्यामुळे दुकानदारास १० टक्के नुकसान झाले तर त्या फ्रिजची खरेदी किंमत किती?
प्रश्न
13
खालीलपैकी कोण १९२५ च्या काकोरी रेल्वे लुटीत सहभागी नव्हते?
प्रश्न
14
विशेषणाचे  शब्द कोणत्या प्रकारचे असतात?
प्रश्न
15
सर्वात लहान वायू कोणता?
प्रश्न
16
१८७५ मध्ये शेतकऱ्यांनी जे दख्खनचे दंगे घडवून आणले, ते प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांमध्ये पसरले होते ?
प्रश्न
17
1962 मधील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा होत्या?
प्रश्न
18
लोकसभेचा सदस्य प्रतिदिनी तारांकित व अतारांकित अशा दोन्ही प्रकारचे जास्तीत जास्त किती प्रश्न विचारू शकतात?
प्रश्न
19
शरीराच्या कोणत्या भागात शक्वाकार पेशी व दंडकार पेशी असतात?
प्रश्न
20
नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
21
पुढील शृंखला पूर्ण करणारी संख्या कोणती?7, 26, 124,  –  , 1330
प्रश्न
22
सदाफुलीपासून कर्करोगावरील कोणते औषध मिळविले जाते?
प्रश्न
23
खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मित भूदृश्याचा भाग नाही?
प्रश्न
24
५ रुपयाच्या नोटाच्या एका पुडक्यात अनुक्रमे १२३८७ पासून १२४२६ पर्यंत क्रमांक आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
प्रश्न
25
२४ × ३० – ५ = ?
प्रश्न
26
बाल न्याय संरक्षक आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला?
प्रश्न
27
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत 8 संघ आहेत. प्ले ऑफ पूर्वी प्रत्येक संघ एकमेकांशी दोन वेळा सामने खेळतो. तर एकूण किती सामने खेळले जातील?
प्रश्न
28
तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
प्रश्न
29
चांगले गाणे ज्याला जमले या वाक्यात विशेषण ओळखा?
प्रश्न
30
ओहोटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडील खंडात उताराचा उथळ भाग म्हणजे…..
प्रश्न
31
तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
32
असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर कॉंग्रेसमध्ये जी फुट पडली, त्यापैकी एका गटाने निवडणुकीचा मार्ग अवलंबण्याचा आग्रह धरला होता. त्या गटातील खालीलपैकी विसंगत नाव कोणते?
प्रश्न
33
वर्ल्डकप फुटबॉल २०१४ कुठल्या देशामध्ये आयोजित केला गेला?
प्रश्न
34
२ ऑक्टोबर २०१२ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर त्या महिन्यात कोणते वार पाच वेळा येतील?
प्रश्न
35
महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत?
प्रश्न
36
(-१) × (-१) × (-१) = ?
प्रश्न
37
समान संबंध असणाऱ्या या उदाहणात  रिक्त जागी काय असावे?BSNL : २१२ : : IDEA : ?
प्रश्न
38
हत्तीच्या सोंडेत किती हाडे असतात?
प्रश्न
39
७ : १६ : ५ : ?
प्रश्न
40
सध्या जळगाव जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन कार्यरत आहेत?
प्रश्न
41
खालील कोणते ठिकाण तालुका नाही?
प्रश्न
42
कसोटी सामन्यात खेळणारा सर्वात लहान वयाचा भारतीय खेळाडू कोण आहे?
प्रश्न
43
जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
44
औद्योगिकरणामुळे गेल्या 10 वर्षात एका शहराची लोकसंख्या दर 5 वर्षात शेकडा 7 ने वाढत गेली. आज शहराची लोकसंख्या 1,14,490 आहे. तर 10 वर्षांपूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?
प्रश्न
45
खालीलपैकी कोणती जमीन महसूल पद्धती लागू करण्याचे श्रेय हॉल्ट मॅकेंझी यांना द्यावे लागेल?
प्रश्न
46
पुढील विधाने विचारात घ्या.अ)१८८२ च्या हंटर कमिशनसमोर पंडिता रमाबाई यांनी साक्ष दिली होती.ब) लॉर्ड मेकॉलोने सुचवलेल्या शिक्षण पद्धतीचे हंटर कमिशनने समर्थन केले होते.
प्रश्न
47
खालीलपैकी कोणत्या जीवाणूस समुद्रातील तेल विघटन करणारा सुपरबग म्हणतात?
प्रश्न
48
खालीलपैकी कोणत्या संख्येस ४ ने नि: शेष भाग जाईल?
प्रश्न
49
‘क्षणात घार आकाशात झेपावली’ या वाक्याचा काळ ओळखा?
प्रश्न
50
आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळेच्या तुलनेत भारतीय प्रमाण वेळेमध्ये किती फरक आहे?
प्रश्न
51
खालील पैकी भाववाचकनाम नसलेला शब्द कोणता?
प्रश्न
52
महाराष्ट्रातील एकूण जंगलक्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र राखीव आहे?
प्रश्न
53
१९२९ च्या शारदा कायद्यान्वये किती वयापेक्षा कमी वयाचा मुलगा लग्न करू शकत नव्हता?
प्रश्न
54
२१ ते ८० दरम्यान मुल संख्या किती?
प्रश्न
55
स्वातंत्र्यपूर्व काळात हमदर्द नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?
प्रश्न
56
४ कि.मी. + ६ मीटर + ५००  सें. मी. = ………….किती मीटर?
प्रश्न
57
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या विभागात मुलभूत अधिकारांचा समावेश आहे?
प्रश्न
58
दोन संख्यातील फरक ८ आहे व त्यांची बेरजेची १/६ पट बरोबर ७ आहे. तर त्यापैकी मूळ संख्या कोणती?
प्रश्न
59
अतिरिक्त पोलीस अधीक्षक चाळीसगांव यांचे नाव काय?
प्रश्न
60
एक साधू शीर्षासन करून उभा आहे. त्याचे तोंड पश्चिमेला आहे तर त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?
प्रश्न
61
भारतात सर्वात जास्त ई कचरा कोठे तयार होते?
प्रश्न
62
भारतात दर वर्षी ” पोलीस दिन” कधी साजरा केला जातो?
प्रश्न
63
भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत?
प्रश्न
64
निकोबार बेट समुहात एकूण किती बेटे आहेत?
प्रश्न
65
४ तास ५ मिनिटांत १ बस १२६  किमी अंतर  जाते, तर ती बस ३५ मिनिटांत किती किमी अंतर जाईल?
प्रश्न
66
औष्णिक वीज प्रकल्पामध्ये अणूच्या केंद्राचे विभाजन कशामुळे होते?
प्रश्न
67
खालील पैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
68
मानवी शरीरातील हाडांची संख्या किती?
प्रश्न
69
समवर्ती सूची मध्ये किती विषयांचा समावेश होतो?
प्रश्न
70
वातावरणामध्ये नायट्रोजन चे प्रमाण किती टक्के आहे?
प्रश्न
71
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे. त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
प्रश्न
72
पुढील वाक्यातील काळ ओळखा? सुलभ दररोज शाळेत जाते.
प्रश्न
73
पुढीलपैकी कोणी दंड संचालनाची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरीसकडे केलेल्या संचलनाशी केली होती?
प्रश्न
74
मी, आम्ही, tu, तुम्ही  हे शब्द सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत ?
प्रश्न
75
चीन या देशाची राजधानी कोणती?
प्रश्न
76
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे १९०७ मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते?
प्रश्न
77
300 मीटर लांबीच्या आगगाडीस तशी 78 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी एक मिनीट वेळ लागतो, तर पुलाची लांबी किती मीटर असेल?
प्रश्न
78
रोहन हा दीपकपेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे. ५ वर्षापूर्वी दीपकचे वय २३ वर्षे होते, तर आणखी  ४ वर्षांनी रोहन व दीपक यांच्या वयात किती अंतर असेल?
प्रश्न
79
सुफी संतांसाठी उर्स साजरा केला जातो, त्या उर्सचा शाब्दिक अर्थ काय आहे?
प्रश्न
80
आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
प्रश्न
81
नेहाने प्रश्नपत्रिकेतील 18 प्रश्न सोडवले, बरोबर उत्तराबद्दल प्रत्येकी 5 गुण मिळून व चुकीच्या उत्तराबद्दल प्रत्येकी 1 गुण कापला जाऊन तिला एकूण 78 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले?
प्रश्न
82
5 मीटर लांब, 80 सेमी रुंद व 20 सेमी जाडीच्या लाकडी खांबातून 2.5 मी लांब, 20 सेमी रुंद व 2 सेमी जाडीच्या किती फळ्या निघतील?
प्रश्न
83
८ टक्के दराने रु. ५००० चे ६ वर्षामध्ये  सरळव्याज किती रुपये होईल?
प्रश्न
84
देशात पहिले महिला डाकघर कोणत्या ठिकाणी सुरु करण्यात आले?
प्रश्न
85
५१२ /० = ?
प्रश्न
86
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना……..मध्ये झाली होती.
प्रश्न
87
निल हरित शेवाळे ही प्रामुख्याने कोणत्या कारणासाठी वापरली जातात?
प्रश्न
88
भारताच्या राज्यघटनेच्या ८ व्या परिशिष्टात किती भाषांचा समावेश केलेला आहे?
प्रश्न
89
बायो डीझेल कशापासून बनविले जाते?
प्रश्न
90
कोणत्या तापमानात फॅरनहाईट व सेल्सिअस यांचे मापन समसमान येते?
प्रश्न
91
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
प्रश्न
92
या पैकी महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण होते?
प्रश्न
93
एका वस्तूची किंमत २० टक्क्यांनी वाढली असता पूर्वीच्या खरेदीत आहे त्याच रकमेत किती टक्के कमी होईल?
प्रश्न
94
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
95
इयत्ता १० वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थीने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिककांनी आपले ९१ रुपये घालून एकूण २११६ रुपये अंधकल्याण निधीसाठी मुख्याध्यापकाकडे जमा केले, तर प्रत्येक विद्यार्थ्यांने किती रुपये वर्गणी दिली?
प्रश्न
96
राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात?
प्रश्न
97
कोणाच्या अध्यक्षतेखाली फैजपूरला राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिवेशन भरविण्यात आले?
प्रश्न
98
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पं. नेहरूंनी स्थापना केलेल्या मंत्रिमंडळ एकूण किती जणांचा समावेश होता?
प्रश्न
99
मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत?
प्रश्न
100
१६ व्या लोकसभेची हंगामी सभापती कोण होते?

राहुन गेलेल्या बातम्या

x