1 October 2024 11:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | भारतातील डेटा सेंटरची क्षमता 30% वाढणार, टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स ठरणार फायद्याचे - Marathi News Bonus Share News | हा शेअर खरेदीला गर्दी, फ्री बोनस शेअर्सबाबत अपडेट, 5 वर्षात दिला 1500% परतावा - Marathi News NBCC Share Price | NBCC स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, शेअर खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 481% परतावा - Marathi News CIBIL Score | सिबिल स्कोर 500 हून खाली घसरला असेल तर चिंता नको, या 5 गोष्टी वापरून वाढवता येईल - Marathi News BHEL Vs IRFC Share Price | IRFC आणि BHEL सहित हे 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Post Office Saving Scheme | पोस्टाची भन्नाट योजना, दर महिन्याला छप्परफाड कमाई करा, गुंतवा केवळ 1,000 रूपये - Marathi News Home Loan EMI | गृहकर्जाचा डोंगर हलका करायचा असेल तर, या 9 स्टेप्स फॉलो करा, EMI सुद्धा होईल कमी - Marathi News
x

Bonus Share News | हा शेअर खरेदीला गर्दी, फ्री बोनस शेअर्सबाबत अपडेट, 5 वर्षात दिला 1500% परतावा - Marathi News

Highlights:

  • Bonus Share NewsNSE: SHAKTIPUMP – शक्ती पंप्स इंडिया कंपनी अंश
  • बोनस शेअर्स  – Shakti Pumps Share Price
  • शेअरने 5 वर्षात 1500% परतावा दिला
Bonus Share News

Bonus Share News | शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. सोमवारी देखील या कंपनीचे (NSE: SHAKTIPUMP) शेअर्स 5 टक्के वाढीसह 4295.45 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकतात. (शक्ती पंप्स इंडिया कंपनी अंश)

आज मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 4,484.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. या कंपनीने बोनस शेअर वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

बोनस शेअर्स 
शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या अनेक कंपन्या त्यांचे राखीव भांडवल उपयोगात आणण्यासाठी, प्रति शेअर कमाई आणि पेड-अप भांडवल वाढवण्यासाठी तसेच राखीव रक्कम कमी करण्यासाठी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करत असतात. बोनस शेअर मिळवण्यासाठी फक्त तेच गुंतवणूकदार पात्र असतात ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड तारीखपूर्वी खरेदी केलेले असतात. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एक्स तारखेला किंवा नंतर शेअर्स खरेदी केले तर त्यांना बोनस शेअर मिळणार नाही.

शेअरने 5 वर्षात 1500% परतावा दिला
शक्ती पंप्स कंपनीच्या प्रवर्तकांकडे जून तिमाहीच्या अखेरीस 51.58 टक्के भागभांडवल होते. 2024 या वर्षात शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 314 टक्के वाढले. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेरनी आपल्या गुंतवणूकदारांना 390 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1500 टक्के वाढवले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on Shakti Pumps Share Price 01 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Bonus Share News(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x