22 November 2024 7:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक पुन्हा मालामाल करणार - Marathi News

Highlights:

  • Reliance Share Price
  • टेक्निकल डेटा आणि टार्गेट प्राईस – NSE: RELIANCE
  • बोनस शेअर्स अपडेट
Reliance Share Price

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मंगळवारी किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. सोमवारी देखील या कंपनीच्या (NSE: Reliance) शेअर्समध्ये 2 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स दिवसभरात 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह 2,976.30 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसभरात या कंपनीचे 44.87 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.89 टक्के घसरणीसह 2,927 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)

टेक्निकल डेटा आणि टार्गेट प्राईस :
रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 20 दिवसांच्या SMA किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकमध्ये 74.14 लाख या 5 दिवसांच्या सरासरी वितरण व्हॉल्यूमच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. दरम्यान शेअर बाजारातील तज्ञांनी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. आरआयएल कंपनीचे शेअर्स टेक्निकल चार्टवर सकारात्मक ट्रेंड दर्शवत आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 3,200 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

बोनस शेअर्स अपडेट :
मागील महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. ऑइल-टू-टेलिकॉम-अँड-रिटेल कंपनीतर्फे दिला जाणारा हा सहावा बोनस इश्यू असेल.

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने पहिल्यांदा 1980-81 मध्ये 3:5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यानंतर या कंपनीने 1983-84 साली 6:10 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. त्यानंतर 1997-98, 2009-10 मध्ये 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्यात आले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x