22 November 2024 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईस बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा - Marathi News

Highlights:

  • RVNL Share Price
  • कंपनीचे प्रलंबित ऑर्डर तपशील – NSE: RVNL
  • ऑर्डर बुकचा आकार – NSE:RVNL
RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारी किंचित नफा वसुली पाहायला मिळाली होती. आरव्हीएनएल कंपनीने (NSE: RVNL) माहिती दिली आहे की त्यांनी 25KV OHE सुधारणा कामांसह 2x25KV फीडर लाइनचे डिझाइन, पुरवठा, उभारणी, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी पूर्व मध्य रेल्वेने मागविलेल्या टेंडरवर सर्वात कमी बोली लावली आहे. या टेंडरचे एकूण मूल्य 180 कोटी रुपये होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

या ऑर्डर अंतर्गत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला EC रेल्वे अंतर्गत धनबाद विभागातील गरवा रोड-महादिया विभागाची यूपी आणि डीएन लाइन टाकण्याचे काम देण्यात आले आहे. मंगळवार दिनांक ऑक्टोबर 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के घसरणीसह 524.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्म – कंपनी ऑर्डरबुक
आरव्हीएनएल कंपनीने अनेक ऑर्डर्सबाबत मेमोरँडम ऑफ असोसिएशनवर स्वाक्षरी केली आहे. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल कंपनीकडे सध्या अनेक ऑर्डर्स प्रलंबित आहेत. याचा फायदा कंपनीला पुढील काळात होऊ शकतो. यामुळे कंपनीच्या महसूल संकलनात आणि निव्वळ नफ्यात वाढ होऊ शकते. तसेच याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या बॅलन्स शीटवर देखील पाहायला मिळू शकतो.

कंपनी ऑर्डरबुकचा आकार
अँटिक ब्रोकिंग फर्मनुसार, वंदे भारत प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये थोडा विलंब होऊ शकतो, कारण आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामधे कंपनीने 2,500 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. या ऑर्डर्स प्राप्तीमुळे कंपनीच्या कमाईमधे पुढील तीन तिमाहीत 8 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. सध्या आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 85,000 कोटी रुपये आहे. हे प्रमाण कंपनीच्या 12 महिन्यांच्या एकूण कमाईच्या तुलनेत 4 पट अधिक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x