4 October 2024 3:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Post Office Scheme | सलग 5 वर्षांपर्यंत मिळवा महिना 9,250 रुपये पेन्शन, अधिक लाभ घेण्यासाठी काय करावे पहा - Marathi News Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल Numerology Horoscope | शनिवार 05 ऑक्टोबर 2024 | तुमची जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? Bigg Boss Marathi | आता जानवीचं काही खरं नाही, विशाखा सुभेदार म्हणाल्या "ती बाहेर आल्यावर मी तिला भेटणारं" - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, फायदा घ्या - Gift Nifty Live Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर ओव्हरबॉट झोनजवळ, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Gift Nifty Live
x

Gratuity On Salary | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, 20 लाखांपर्यंत ग्रॅच्युईटी रक्कम मिळणार - Marathi News

Highlights:

  • Gratuity On Salary
  • ग्रॅच्युईटी म्हणजे काय
  • ग्रॅच्युईटीचे फायदे
  • ग्रॅच्युईटी कायदा 1972
  • नॉमिनीला मिळते ग्रॅच्युईटी
  • हा आहे ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेशन फॉर्मुला
  • प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी
Gratuity On Salary

Gratuity On Salary | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पगार तर मिळतोच त्याचबरोबर विविध फायदे देखील मिळतात. ज्यामध्ये पीएफ, मेडिकल, इन्शुरन्स आणि त्याचबरोबर ग्रॅच्युइटी देखील शामिल असते. या सर्व सुविधा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असलेल्या पाहायला मिळतात. काही नवीन तरुण-तरुणींना ग्रॅच्युईटी संबंधितच्या बऱ्याच गोष्टी माहितच नसतात. जर तुम्ही नुकतेच नोकरीला लागले आहात तर, ग्रॅच्युईटी संबंधीच्या या गोष्टी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

1) ग्रॅच्युईटी म्हणजे काय :
समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात आणि तुम्ही तुमच्या कामाच्या योगदानाचे 5 पेक्षा जास्त वर्ष कंपनीला दिले आहेत. तर, कंपनी स्वतःकडून एका बक्षीस स्वरूपात तुम्हाला ग्रॅच्युईटी प्रदान करते. सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ग्रॅच्युईटीचा लाभ घेता येतो. ज्यामध्ये एखादा कर्मचारी 20 वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी करत असेल तर त्याला रिटायरमेंटनंतर ग्रॅच्युईटीची एक चांगली रक्कम देण्यात येते.

2) ग्रॅच्युईटीचे फायदे :
प्रायव्हेट किंवा सरकारी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 10 पेक्षा जास्त असेल तर, कंपन्यांना सर्व कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी द्यावी लागते. केवळ कंपन्याच नाही तर, दुकान, फॅक्टरी यांसारख्या सर्व प्रायव्हेट क्षेत्रांचा यामध्ये समावेश होतो.

3) ग्रॅच्युईटी कायदा 1972 :
ग्रॅच्युईटी कायदा हा 1972 सालापासून लागू झाला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर एक चांगली रक्कम देण्यात येते. जेणेकरून कर्मचारी त्यांच्या भविष्यासाठी काही ना काही खर्च करू शकतील. परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली ग्रॅच्युइटी मिळत नाही. त्यामुळे त्यांना वारंवार नोकरी बदलण्याची गरज भासते.

4) नॉमिनीला मिळते ग्रॅच्युईटी :
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाला तर, त्याने नॉमिनी केलेल्या व्यक्तीला ग्रॅच्युईटीचे पैसे मिळतात. हे पैसे काढण्यासाठी पाच वर्षे पूर्ण असलेल्या नियम लागू होत नाही.

5) हा आहे ग्रॅच्युईटी कॅल्क्युलेशन फॉर्मुला :
तुम्हाला तुमच्या पगारानुसार ग्रॅच्युइटी रक्कम मोजायची असेल तर, या फॉर्मुल्याचा वापर करा. फॉर्मुला – मूळ वेतन + काम केलेली वर्षांची संख्या*15/26. या फॉर्मुल्याचा वापर करून तुम्ही ग्रॅच्युइटी रक्कम मोजू शकता. यामध्ये मुळवेतन आणि काम केलेले वर्षांची संख्या टाकायची आहे. त्यानंतर 15/26 म्हणजे पगारासाठीचे प्रत्येक महिन्यातील दिवस आणि 26 म्हणजे प्रत्येक महिन्यातील कामाचे दिवस. तर, अशा पद्धतीने ग्रॅच्युविटी रक्कम मोजता येते.

6) प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी :
प्रायव्हेट क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युईटीची रक्कम वाढवून 20 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पैशांवर त्यांना टॅक्स द्यावे लागत नाही. त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युईटीच्या रकमेवर आधीपासूनच आकारण्यात येत नाही. म्हणजे तो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधीपासूनच ग्रॅच्युईटी टॅक्स फ्री आहे.

Latest Marathi News | Gratuity On Salary 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Gratuity on Salary(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x