4 October 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या आवडत्या ट्वीस्टमधून मिळणार सर्वांना डेंजर झटका, एक सदस्य घराचा निरोप घेणार - Marathi News NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करणार हा स्टॉक, कमाईची मोठी संधी - Gift Nifty Live IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक ब्रेकआऊट देणार, फायदा घ्या - Gift Nifty Live Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदाच फायदा - Gift Nifty Live RVNL Share Price | RVNL शेअर करणार मालामाल, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2104% परतावा - Gift Nifty Live Smart Investment | हलक्यात घेऊ नका, अवघा ₹20,000 पगार असेल तरी बचतीवर 1 कोटी 66 लाख परतावा मिळवू शकता 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना बोनसनंतर आता DA वाढीची प्रतीक्षा, लवकरच मिळणार खुशखबर - Marathi News
x

CIBIL VS Credit Score | कर्ज घेत असाल तर आधी क्रेडिट स्कोर आणि सिबिल स्कोर मधील फरक जाणून घ्या, गोष्टी सोप्या होतील

Highlights:

  • CIBIL Vs Credit Score
  • असा ठरवतात सिबिल स्कोर
  • सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोरमध्ये नेमका काय फरक
CIBIL Vs Credit Score

CIBIL Vs Credit Score | प्रत्येक ठिकाणाची नॉन बँकिंग फायनान्स कंपनी किंवा इतर बँकांमध्ये कर्जासाठी मागणी करणाऱ्या व्यक्तीचा सर्वप्रथम सिबिल स्कोर तपासला जातो. ज्या व्यक्तीच्या सिबिल स्कोरने उच्चांक गाठलेला असतो त्यालाच चांगल्या दर्जाचे लोन प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही लोन संबंधितचे सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर हे दोन शब्द कुठे ना कुठे नक्कीच ऐकले असतील.

बऱ्याच व्यक्ती क्रेडिट स्कोर आणि सिबिल स्कोर या दोन शब्दांमध्ये प्रचंड कन्फ्युज असतात. आज आम्ही या दोन्हीही शब्दांचा अर्थ समजावून सांगणार आहोत. सांगायचं झालं तर ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेड या आधी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड सिबिल म्हणून ओळखली जायची. ही एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे.

याव्यतिरिक्त सीआरआयएफ, एक्सपिरियन, हाय मार्क आणि इक्वीफॅक्स या देखील तीन क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत आणि म्हणूनच क्रेडिट स्कोर हे एक महत्त्वपूर्ण मॅट्रिक मानले गेले आहे. हा क्रेडिट स्कोर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या कर्जाचे मूल्यांकन करण्यासाठी उपयोगी ठरतो.

असा ठरवतात सिबिल स्कोर :

सिबिल स्कोर हा कर्जदाराची क्रेडिट हिस्ट्री तपासण्यासाठी महत्त्वाचा असतो. ही हिस्ट्री तो तीन अंकांमध्ये सांगतो. अशातच सीबिल स्कोर हा 300 ते 900 या रेंजमध्ये असतो. समजा तुम्हाला कोणतही कर्ज घ्यायचं असेल तर, तुमचा सिबिल स्कोर 750 च्या आसपास असणे चांगले मानले जाते. मध्ये ज्या व्यक्तीचा जेवढा जास्तीत जास्त स्कोर असेल तितकीच ती गोष्ट चांगली असते. जास्तीच्या सिबिल स्कोरमुळे तुम्हाला लोन घेण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही.

सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोरमध्ये नेमका काय फरक :

सिबिल स्कोर आणि क्रेडिट स्कोर या दोघांमधील फरक साध्या शब्दांचा सांगायचं झालं तर, क्रेडिट स्कोरच्या वापराने आपण एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक क्षमतेचं मूल्यांकन काढू शकतो. त्याचबरोबर सिबिल स्कोर हा देशातील सिबिल क्रेडिट ब्युरोमार्फत पाहिला जातो. त्याचबरोबर सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान असतो ज्यामध्ये व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्रीसह लोन परतफेडीची सर्व काही माहिती नमूद केलेली असते.

Latest Marathi News | CIBIL Vs Credit Score 03 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#CIBIL Vs Credit Score(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x