22 November 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News

Peel Off Mask

Peel Off Mask | नुकताच नवरात्री सण सुरू झाला आहे. आज नवरात्रीचा नऊ दिवसांमधील पहिला दिवस आहे. आजच्या दिवशी देवीने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. पिवळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. आता नवरात्री आली म्हणजे गरबा देखील आला. प्रत्येक तरुणाईला गरब्याने वेड लागलं आहे. ढोल ताशांच्या नगाड्यावर थिरकण्यासाठी तरुणांना आवडते.

अशाच नवरात्रीमध्ये गरबा खेळण्यासाठी अनेक मुली छान तयार होऊन जातात. परंतु घामामुळे आणि लाइटिंग्समुळे चेहरा प्रचंड प्रमाणात डल आणि खराब दिसू लागतो. आज आम्ही तुम्हाला नवरात्री स्पेशल खास पील ऑफ मास्क सांगणार आहोत. हे पील ऑफ मास्क पिवळ्या रंगाचं असून दही आणि कॉफीपासून तयार केले जाते.

अशा पद्धतीने तयार करा पील ऑफ मास्क :

घरगुती पद्धतीने पील ऑफ मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये एक चमचा दही आणि दहा रुपयांची कॉफी पावडर पूर्ण मिक्स करायची आहे. कॉफी आणि दह्याचा फेस मास्क तुमच्या चेहऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. तुम्हाला हे मिश्रण एकत्रित करून चेहऱ्यावर ब्रशच्या सहाय्याने अप्लाय करून घ्यायचे आहे. त्यानंतर पील ऑफ मास्क तयार करण्यासाठी अप्लाय केलेल्या मिश्रणावर तुम्हाला चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे टिशू पेपर कापून लावायचे आहेत.

टिशू पेपर लावल्याने संपूर्ण मिश्रण टिशू पेपरमध्ये शोषले जाईल. पुढे अर्ध्या तासानंतर मिश्रण पूर्णपणे सुकल्यानंतर तुम्हाला टिशू पेपर म्हणजेच होममेड पील ऑफ मास्क पील करायचा आहे म्हणजेच हळुवारपणे खेचून काढायचा आहे. तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आल्याचा पाहायला मिळेल.

फायदे :
आपण या मास्कमध्ये दही आणि कॉफीचा उपयोग केला आहे. कॉफी ही आपल्या शरीरासह त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असते. त्याचबरोबर दह्यामध्ये त्वचेला मॉइश्चराईज करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे दही आणि कॉफीचा फेस पॅक तुमच्या चेहऱ्यासाठी उत्तम फेस पॅक ठरू शकतो.

Latest Marathi News | Peel Off Mask 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Peel Of Mask(1)Peel-off Mask(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x