4 October 2024 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या आवडत्या ट्वीस्टमधून मिळणार सर्वांना डेंजर झटका, एक सदस्य घराचा निरोप घेणार - Marathi News NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करणार हा स्टॉक, कमाईची मोठी संधी - Gift Nifty Live IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक ब्रेकआऊट देणार, फायदा घ्या - Gift Nifty Live Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदाच फायदा - Gift Nifty Live RVNL Share Price | RVNL शेअर करणार मालामाल, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2104% परतावा - Gift Nifty Live Smart Investment | हलक्यात घेऊ नका, अवघा ₹20,000 पगार असेल तरी बचतीवर 1 कोटी 66 लाख परतावा मिळवू शकता 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना बोनसनंतर आता DA वाढीची प्रतीक्षा, लवकरच मिळणार खुशखबर - Marathi News
x

SBI Mutual Fund | नोकरदार वर्गाच्या खास SBI योजना, डोळे झाकुन SIP करा, परताव्याने पैशाचं टेन्शन मिटेल - Marathi News

Highlights:

  • SBI Mutual Fund
  • एसबीआई कंजम्‍पशन अपॉर्च्‍यूनिटी फंड डिटेल
  • एसआयपी गुंतवणुकीवर परतावा
  • एकरकमी गुंतवणुकीवर परतावा
  • योजनेचे तपशील
  • पोर्टफोलिओमधील शेअर्स
SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाच्या अशा काही योजना आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 5 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे पेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक केली होती, त्यांना मजबूत परतावा मिळाला आहे.

एसबीआई कंजम्‍पशन अपॉर्च्‍यूनिटी फंड ही योजना सुरू होऊन 25 वर्षे झाली असून या योजनेने SIP गुंतवणूकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त वार्षिक परतावा कमावून दिला आहे. जर एखाद्याने सुरुवातीपासून या योजनेत मासिक 5000 रुपये SIP गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 कोटीपेक्षा जास्त झाले आहे. मागील 25 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने SIP गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तसेच या योजनेने एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक 16.6 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एसआयपी गुंतवणुकीवर परतावा :
* 25 वर्षांत SIP वार्षिक परतावा : 20.2 टक्के
* मासिक SIP गुंतवणूक : 5000 रुपये
* 25 वर्षात केलेली एकूण गुंतवणूक : 15,00,000 रुपये
* SIP चे एकूण मूल्य 25 वर्षानंतर : 3,23,25,321 रुपये

या योजनेने मागील 10 वर्षांत गुंतवणुकदारांना एसआयपीवर वार्षिक सरासरी 21.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या योजनेत मासिक 10,000 रुपये गुंतवणूक केली होती, त्यांना 10 वर्षांत 36,84,676 रुपये परतावा मिळाला आहे. मागील 5 वर्षांत या योजनेने SIP गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 31.9 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. आणि ज्यांनी 10,000 रुपये मासिक गुंतवणूक केली होती त्यांना 5 वर्षांत 13,13,064 रुपये परतावा मिळाला आहे.

एकरकमी गुंतवणुकीवर परतावा
* 1 वर्षात परतावा : 45.34 टक्के
* 3 वर्षात परतावा : 27.92 टक्के
* 5 वर्षात परतावा : 25.04 टक्के
* 7 वर्षात परतावा : 19.72 टक्के
* 10 वर्षात परतावा : 17.85 टक्के
* 20 वर्षात परतावा : 20.64 टक्के
* लॉन्‍च झाल्यापासून परतावा : 16.59 टक्के

योजनेचे तपशील
* लॉन्चची तारीख : 5 जुलै 1999
* लाँच झाल्यापासून परतावा : 16.59 टक्के वार्षिक
* बेंचमार्क : NIFTY इंडिया कन्झम्पशन TRI
* एकूण AUM : 2854 कोटी रुपये
* खर्चाचे प्रमाण : 1.98 टक्के
* किमान SIP गुंतवणूक : 500 रुपये

एसबीआई कंजम्‍पशन अपॉर्च्‍यूनिटी फंड 96.28 टक्के पैसे इक्विटी आणि इक्विटी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवणूक करते. तर 3.72 टक्के रक्कम या फंडाद्वारे रोख किंवा त्याच्याशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवली जाते. हा फंड प्रामुख्याने तंत्रज्ञान, FMCG, ग्राहक विवेकाधिकार आणि ग्राहक स्टेपल्स क्षेत्रात पैसे गुंतवतो.

पोर्टफोलिओमधील शेअर्स
* गणेश इकोस्फियर
* भारती एअरटेल
* जुबिलंट फूडवर्क्स
* युनायटेड ब्रुअरीज
* ITC लिमिटेड
* HUL हिंदुस्तान युनिलिव्हर
* व्हर्लपूल ऑफ इंडिया
* कोलगेट-पामोलिव्ह
* महिंद्रा अँड महिंद्रा
* ब्रिटानिया इंडस्ट्रीज
* EIH
* पेज इंडस्ट्रीज
* ब्लू स्टार

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund NAV Today 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x