22 November 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

RVNL Share Price | RVNL शेअर करणार मालामाल, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2104% परतावा - Gift Nifty Live

Highlights:

  • RVNL Share Price – NSE: RVNL – रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीला ऑर्डर मिळाली
  • इतर कॉन्ट्रॅक्ट तपशील
  • RVNL स्टॉकचा परतावा
  • मागील 5 वर्षात 2104% परतावा दिला
RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीला मागील काही दिवसात 463 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या (NSE: RVNL) आहेत. 24 जानेवारी 2003 रोजी स्थापन झालेल्या आरव्हीएनएल कंपनीला सप्टेंबर 2013 मध्ये मिनी-रत्न दर्जा बहाल करण्यात आला होता. मागील वर्षी, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील आरव्हीएनएल कंपनीला ‘नवरत्न’ दर्जा देण्यात आला होता. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीला ऑर्डर मिळाली
नुकताच ईस्ट कोस्ट रेल्वेकडून आरव्हीएनएल कंपनीला ओडिशातील बांधकामांसाठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची पूर्तता पुढील 24 महिन्यांत करायची आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 283.69 कोटी रुपये आहे. 30 सप्टेंबर रोजी या कंपनीला पूर्व मध्य रेल्वेकडून 180 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या. आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 2.41 टक्के घसरणीसह 497.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

इतर कॉन्ट्रॅक्ट तपशील
आरव्हीएनएल कंपनीने DMRC सोबत देखील सामंजस्य करार केला आहे. यापूर्वी आरव्हीएनएल कंपनीने भारत आणि परदेशातील डिझाइन, बांधकाम आणि सल्लागार प्रकल्पांसाठी प्रकल्प सेवा प्रदाता म्हणून सहयोग आणि संयुक्तपणे काम करण्यासाठी दिल्ली मेट्रोसोबत MOU केला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्क्यांनी घसरून 524.80 रुपये किमतीवर पोहचले होते. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,09,421.85 कोटी रुपये आहे.

RVNL स्टॉकचा परतावा
आरव्हीएनएल स्टॉक BSE 200 चा भाग आहे. मागील 1 आणि 2 आठवड्यात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 0.29 टक्के आणि 1.10 टक्क्यांनी पडले होते. मागील 3 आणि 6 महिन्यांत या सरकारी कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 26.48 टक्के आणि 100.42 टक्क्यांनी वाढले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 188.06 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील 5 वर्षात 2104% परतावा दिला
मागील 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 209.74 टक्के, 1456.97 टक्के, 1649 टक्के आणि 2104.62 टक्क्यांनी मजबूत झाले होते. 2024 मध्ये आरव्हीएनएल कंपनीने 23 सप्टेंबर रोजी एक्स-डेटसह 2.11 रुपये लाभांश वाटप केला होता. 2022 मध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 1.58 रुपये आणि 0.25 रुपये, 2023 मध्ये 1.77 रुपये आणि 0.36 रुपये लाभांश वाटप केला होता. सध्याच्या बाजारभावानुसार आरव्हीएनएल कंपनीचे लाभांश उत्पन्न 0.40 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 04 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x