5 October 2024 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News SBI Special FD | SBI बँकेच्या 'या' जबरदस्त स्कीमला मुदतवाढ, बँकेत गर्दी, मोठ्या व्याजदरा सह मिळेल मोठा परतावा - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअरने दिला 600% परतावा, पुढे तेजी टिकून राहील का, तज्ज्ञांनी काय म्हटलं पहा - Marathi News Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News Smart Investment | गृहिणींनो आता डब्यात नाही तर बँकेत पैसे जमा करा, 500 रुपयांची SIP बनवेल लखपती - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 5 शेअर्स करतील मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
x

Smart Investment | गृहिणींनो आता डब्यात नाही तर बँकेत पैसे जमा करा, 500 रुपयांची SIP बनवेल लखपती - Marathi News

Highlights:

  • Smart Investment
  • 500 रुपयांची करा एसआयपी :
  • इतक्या वर्षांत जमा होतील 5 लाख रुपये :
  • 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती पैसे मिळतील :
Smart Investment

Smart Investment | घरात बसून असलेल्या बऱ्याच गृहिणी प्रत्येक महिन्याला पैसे कमावत नाहीत. त्यांच्या हातात घरातील कर्त्या व्यक्तीकडून जेवढे पैसे येतात त्या पैशात घर चालवून आणि काही पैसा गाठीशी बांधून त्या 200 किंवा 500 रुपयांची बचत करत असतात. परंतु केवळ घरामध्ये पैसे साठवून तुम्ही लखपती बनू शकत नाही. यासाठी तुम्हाला पैशांची गुंतवणूक करावी लागेल. जेणेकरून तुम्ही गुंतवलेला पैशांवर व्याजाची रक्कम देखील मिळवू शकता.

असं पाहायला गेलं तर, कोणतीही गृहिणी केवळ प्रत्येक महिन्याला 500 रुपयांच्या बचतीवर 5,00,000 लाख रुपयांएवढा फंड जमा करू शकते. सध्या मार्केटमध्ये अशा अनेक स्कीम राबवल्या जात आहेत. ज्यामध्ये दीर्घकाळात तुम्ही भली मोठी रक्कम जमा करू शकता. ही रक्कम तुम्ही तुमच्या भविष्यासाठी वापरू शकता. विशेष म्हणजे पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर जाण्याची गरज नाही. सर्वकाही ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही करू शकाल.

500 रुपयांची करा एसआयपी :

पैसे गुंतवणुकीसाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे SIP तुम्ही एसआयपीद्वारे कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून भविष्यामध्ये चांगला निधी जमा करू शकता. एसआयपीद्वारे म्युचल फंडमध्ये पैसे गुंतवल्याने तुम्हाला 12% व्याजदर दिले जाईल. व्याजदराची रक्कम जास्त असल्याने त्याचबरोबर गुंतवणुकीचा कार्यकाळदेखील जास्तीचा असल्यामुळे तुम्हाला बक्कळ पैसे कमवता येतील.

इतक्या वर्षांत जमा होतील 5 लाख रुपये :

समजा एखाद्या गृहिणीने प्रत्येक महिन्याला 20 वर्षांकरिता 500 रुपयांची गुंतवणूक सुरू ठेवली तर, तिच्या खात्यात एकूण 1,20,000 रुपये जमा होतील. यामधील दिल्या गेलेल्या व्याजदरानुसार 3,79,574 एवढी रक्कम जमा होईल. या रकमेमध्ये इंटरेस्ट रेट आणि इन्वेस्टेड अमाऊंट ऍड केली तर, ही रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. म्हणजेच केवळ 500 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला 5,00,000 लाखांची मालकीण बनवू शकते.

1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर किती पैसे मिळतील :

समजा एखादी गृहिणी एसआयपी खात्यात 1,000 रुपये गुंतवत असेल तर, केवळ 15 वर्षांमध्ये 5,04,576 रुपयांचा फंड जमा करू शकेल. तर, आणखीन पाच वर्षांमध्ये म्हणजेच एकूण 20 वर्षांमध्ये 1000 रुपयाच्या गुंतवणुकीनुसार आणि दिल्या गेलेल्या व्याजदरानुसार 9,99,148 एवढी रक्कम जमा होईल.

Latest Marathi News | Smart Investment 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x