5 October 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक बाबत मोठी अपडेट, स्टोकक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - Marathi News Korean Hair Care Tips | साऊथ कोरियाच्या मुलींसारखे सिल्की हेअर हवेत, मग ट्राय करा हा मॅजिकल शाम्पू - Marathi News IREDA Share Price | आता नाही थांबणार, IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मालामाल करणार हा मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News Senior Citizen Saving Scheme | पोस्टाच्या या जबरदस्त योजनेत पैसे गुंतवा, 5 वर्षांत कमवाल व्याजाचे 12 लाख रुपये - Marathi News My EPF Money | खाजगी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, EPF योगदान मर्यादा वाढणार, EPF ची अधिक रक्कम मिळणार - Marathi News
x

Post Office RD Calculator | पोस्ट ऑफिसची ढासू स्कीम, केवळ व्याजदराने होईल 2 लाखांची कमाई, फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Post Office RD Calculator
  • मिळतो टॅक्स सूटचा फायदा :
  • वेगवेगळ्या टेनॉरवर मिळते एवढे व्याज :
  • अशा पद्धतीने कमवाल व्याजातून भली मोठी रक्कम :
Post Office RD Calculator

Post Office RD Calculator | पोस्टाच्या टर्म डिपॉझिट या योजनेमध्ये सरकारकडून जबरदस्त व्याजदर प्रदान केले जात आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना सलग 5 वर्षांपर्यंत गुंतवणूक करायची आहे. केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना 7.5% हिशोबाने व्याजदर दिले जाणार.

बरेच जाणकार व्यक्ती पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. पोस्टाच्या बऱ्याच योजना दीर्घकाळासाठी चांगले व्याजदर प्रदान करतात. केवळ व्याजानेच अनेकांना फायदा होतो आणि म्हणूनच पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे सुरक्षिततेचे आणि विश्वासाचे वाटते. पोस्टाची टाईम डिपॉजिट योजना देखील अनेकांना केवळ व्याजदरानेच जास्तीत जास्त लाभ मिळवून देणारी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला एकूण 7.5% वार्षिक व्याजदर दिले जाते. त्याचबरोबर या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड एकूण 5 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे तुम्हाला या योजनेवर टॅक्स सूटचा फायदा देखील मिळतो.

मिळतो टॅक्स सूटचा फायदा :
पोस्टाच्या टाईम डिपॉजिट योजनेमध्ये आयकर विभागाच्या 1961 सेक्शन 80C अंतर्गत ग्राहकांना टॅक्स सूटचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे या योजनेमध्ये तुम्ही सिंगल आणि जॉईंट खातं उघडू शकता. दरम्यान या योजनेमध्ये वयाची कोणतेही अट नसून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. समजा तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या नावावर खात उघडू इच्छित असाल तर, त्याच्या परिजनांनी खात्याची जबाबदारी घ्यावी.

वेगवेगळ्या टेनॉरवर मिळते एवढे व्याज :
पोस्टाच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये तुम्ही वेगवेगळ्या टेनॉरसाठी इन्वेस्टमेंट करू शकता. ज्यामध्ये 1 ते 5 वर्षांसाठी गुंतवणुकीचे पर्याय आहेत. यामध्ये एका वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.9% व्याजदर दिले जाते. दोन आणि तीन वर्षांच्या गुंतवणुकीसाठी तुम्हाला सात टक्के व्याजदर दिले जाते. तर, पाच वर्षांकरिता 7.5% व्याजदर दिले जाते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टेनॉरवर तुम्हाला वेगवेगळे व्याजदर देखील प्रदान केले जाते.

अशा पद्धतीने कमवाल व्याजातून भली मोठी रक्कम :
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये पाच वर्षांकरिता 5 लाखांची गुंतवणूक केली तर, 7.5% व्याजदराने 2,24,974 एवढी रक्कम व्याजानेच मिळेल. याचाच अर्थ मॅच्युरिटी टाईमवर मिळणारी एकूण रक्कम 7,24,974 लाख एवढी असेल.

Latest Marathi News | Post Office RD Calculator 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office RD Calculator(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x