7 October 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senco Gold Share Price | सोनं नव्हे, हा सोनं बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करेल, इथे संपत्ती वाढवा - Marathi News Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रा आणि रिलायन्स पॉवर शेअर्स मालामाल करणार, कंपनीबाबत मोठी अपडेट - Marathi News SBI Mutual Fund | पगारदारांनो, या फंडाच्या योजना महीना SIP वर 42 लाख रुपये पर्यंत परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा - Marathi News IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक पुन्हा फोकस मध्ये, फायद्याची अपडेट आली - Marathi News NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, स्टॉक देणार ब्रेकआऊट, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला - Marathi News Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Vodafone Idea Share Price | पुन्हा रॉकेट होणार 9 रुपयाचा पेनी शेअर, मिळेल 100% परतावा, BUY रेटिंग - Marathi News
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - Marathi News

Highlights:

  • IPO GMP – गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी अंश
  • आयपीओ प्राइस बँड
  • ग्रे मार्केटमध्ये सकारात्मक संकेत
  • कंपनीबद्दल
IPO GMP

IPO GMP | शेअर बाजारात झटपट कमाईचा मार्ग म्हणजे IPO गुंतवणूक असं मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळतंय. अनेक IPO लिस्टिंगच्या दिवशीच मल्टिबॅगर परतावा देत आहेत. त्यामुळे आगामी IPO वर सुद्धा गुंतवणूकदारांची नजर आहे. त्याच गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. (गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी अंश)

कारण, गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. विशेष म्हणजे या आयपीओबाबत ग्रे मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत आहेत. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना 8 ऑक्टोबर 2024 पासून सट्टा लावता येणार आहे. तसेच हा आयपीओ 11 ऑक्टोबर 2024 पर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल.

आयपीओ प्राइस बँड
गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या आयपीओचा एकूण आकार 264.10 कोटी रुपये असणार आहे. गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ऑफर फॉर सेल अंतर्गत 1.83 कोटी नवे शेअर्स आणि 95 लाख शेअर्स जारी करणार आहे.

या IPO शेअरची प्राइस बँड 92 ते 95 रुपये आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी कंपनीने एकूण 157 शेअर्स तयार केले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 14 हजार 915 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी बीएसई आणि एनएसईवर सुद्धा लिस्ट होणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये सकारात्मक संकेत
इन्व्हेस्टरगेनने दिलेल्या रिपोर्टनुसार, गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी आज ग्रे मार्केटमध्ये 18 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. मात्र कालपासून जीएमपीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, शेअर लिस्टिंगपर्यंत ग्रे-मार्केटमध्ये हा ट्रेंड कायम राहिल्यास कंपनीचा शेअर 19% प्रीमियमसह स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण करू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मात्र, जीएमपी मध्ये दररोज बदल होत असतो असं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

कंपनीबद्दल
या कंपनीच्या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी जास्तीत जास्त 50% राखीव ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान 35% शेअर राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर NII साठी किमान 15% राखीव ठेवण्यात येणार आहे. गरुड कन्स्ट्रक्शन अँड इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी 2010 मध्ये स्थापन करण्यात आली होती. ही एक बांधकाम कंपनी असून ती निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक प्रकल्पांची निर्मिती करते. कॉर्पविस अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडने आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजरची नियुक्ती केली आहे. तर लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या इश्यूची रजिस्ट्रार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP Of Garuda Construction Ltd 07 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(98)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x