8 October 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर पुन्हा फोकसमध्ये, मालामाल करणार रिलायन्स ग्रुपचा शेअर - Marathi News

Highlights:

  • Jio Finance Share Price NSE: JIOFIN – जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अं
  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची स्थिती
  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉकचा करार
  • 1 वर्षात दिला 50% परतावा
  • कंपनीचे तिमाही परिणाम
Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जागतिक घडामोडींमुळे पुन्हा पाचव्या दिवशी देखील स्टॉक मार्केट घसरला आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजाराने जोरदार (NSE: JIOFIN) उसळी घेतली, मात्र त्यानंतर बाजार पुन्हा घसरला. सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला. तर दुसरीकडे निफ्टी 200 अंकांनी घसरला. तसेच मिडकॅप निर्देशांकात 1300 अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अंश)

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची स्थिती
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची किंमत सकाळी 3 टक्क्याने वाढली होती. शेअर बाजार उघडताच हा शेअर 346.90 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. मात्र त्यांनतर शेअर 1.48 टक्क्यांनी घसरून 333.80 रुपयांवर पोहोचला. दरम्यान, सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या म्युच्युअल फंड व्यवसायाला हिरवा कंदील दिल्यानंतर स्टॉक प्राईसमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.85 टक्के वाढून 339.20 रुपयांवर ट्रेड करत आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉकचा करार
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने म्युच्युअल फंड क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी जागतिक दर्जाच्या मालमत्ता व्यवस्थापक ब्लॅकरॉकसोबत भागीदारी करार केली आहे, ज्याला मार्केट रेग्युलेटर सेबीने अधिकृत मंजुरी दिली आहे. दरम्यान, मागील वर्षी जुलैमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक कंपनीने इन्व्हेस्टमेंट सोल्युशन देण्यासाठी 50:50 संयुक्त उपक्रमासाठी करार केला होता.

1 वर्षात दिला 50% परतावा
मागील 1 महिन्याचा विचार केल्यास जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर नुकसान करणारा ठरला आहे. मागील 1 महिन्यात शेअरने अवघी 1.5% वाढ नोंदवली आहे. तर मागील सहा महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. परंतु, मागील 1 वर्षाचा विचार केल्यास जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

कंपनीचे तिमाही परिणाम
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत एकूण 13 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तसेच जून 2024 मध्ये व्याजाचे उत्पन्न 20 टक्क्यांनी घटून 162 कोटी रुपये झाले, तर कंपनीचा खर्च वर्षभरापूर्वीच्या 54 कोटी रुपयांवरून 79 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचा खर्च जून 2024४ मध्ये तिपटीने वाढून 39 कोटी रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x