16 October 2024 5:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपच्या पेनी शेअरने दिला 1200% परतावा, शेअर BUY करावा की Sell - NSE: ALOKIND GTL Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, रिलायन्स ग्रुपकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, स्टॉक रॉकेट होणार - BSE: 513337 IRFC Vs IREDA Share Price | IRFC ते IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, BUY करावा - NSE: IRFC Infosys Share Price | इन्फोसिस शेअर्स तेजीत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, दिला महत्वाचा सल्ला, संधी सोडू नका - NSE: INFY Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक होणार रॉकेट, व्होडाफोन-आयडिया कंपनीचा मोठा प्लॅन - NSE: IDEA Tata Motors Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा टाटा मोटर्स शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Smart Investment | स्मार्ट बचत करून पैसा वाढवा, बचत 45 रुपये आणि मिळतील 25 लाख रुपये - Marathi News

Smart Investment

Smart Investment | भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत म्हणजेच एलआयसी अंतर्गत मध्यमवर्गीय व्यक्तींसाठी बरेचअसे उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर एलआयसीच्या अनेक पॉलिसी असून बरेच लोक आपल्या भविष्यकरिता त्याचबरोबर कुटुंबीयांकरिता एलआयसी पॉलिसीचा लाभ घेताना दिसतात. अशीच एक पॉलिसी म्हणजे ‘जीवन आनंद पॉलिसी’.

मिळेल चांगला परतावा :
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या विमाधारकांना प्रीमियम भरून झाल्यानंतर देखील विमा संरक्षण मिळत राहते. या पॉलिसीमध्ये तुम्ही केवळ 45 रुपये दर दिवसाला गुंतवणूक 35 वर्षांमध्ये 25 लाख रुपयांची भरघोस रक्कम जमा करू शकता.

पॉलिसीचे अतिरिक्त फायदे :
एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये विमाधारकाला बोनस आणि मृत्यूचे फायदे मिळतातच सोबतच अतिरिक्त संरक्षण देखील मिळते. ज्यामध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर यांसारखे अनेक फायदे असतात. एवढेच नाही तर, पॉलिसी प्रीमियम भरण्याचे वेगवेगळे पर्याय देखील प्रदान केले जातात. ज्यामध्ये विमाधारकाची इच्छा असेल तर तो 2 वर्षांनी पॉलिसी सरेंडर करू शकतो.

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीचे वैशिष्ट्य जाणून घ्या :
विमाधारकाला पारंपारिक एडॉवमेंट पॉलिसीमध्ये अतिरिक्त बोनस दिला जातो त्याचबरोबर विमा रक्कम देखील दिली जाते. त्याचबरोबर पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जाते. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास 5 लाखांची कव्हर रक्कम प्रदान केली जाते.

अतिरिक्त टॉपअप कव्हर पर्याय :
एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये प्रवेश करण्यासाठी किमान 18 वय वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त वयाची मर्यादा 55 वर्षांपर्यंत दिली गेली आहे. दरम्यान पॉलिसि टर्म हा 15 ते 35 वर्षांचा दिला असून, मूळ विमारक्कम 1 लाख रुपये दिले आहे. त्याचबरोबर प्रीमियम रिबेट वार्षिक पेमेंटकरिता 2% देण्यात आली असून, सहा महिन्यांसाठी कर्ज सुविधा 1% देण्यात आली आहे.

कॅल्क्युलेशन पहा :
एलआयसीच्या या भन्नाट पॉलिसीमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला 1,358 रुपयांची गुंतवणूक करून 35 वर्षांमध्ये 25 लाखांची भली मोठी रक्कम जमा करू शकता. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये दोन प्लॅनचा समावेश केला आहे. ज्यामध्ये एकूण 5 लाखांची मूळ वीमारक्कम समाविष्ट आहे तर, 35 वर्षांमध्ये 5,70,500 रक्कम ठेव आहे.

एवढा मिळणार पॉलिसीधारकाला बोनस :
पॉलिसीचा मॅच्युरिटी पीरियड संपल्यानंतर विमाधारकाला 8.60 लाखांचा बोनस मिळेल त्यानंतर जमा केलेल्या रक्कमेव्यतिरिक्त 11.50 लाखांचा अंतिम बोनस प्राप्त होईल. परंतु विमाधारकाला या बोनसकरिता प्राप्त होण्यासाठी पॉलिसी मुदत 15 वर्ष असणे गरजेचे आहे.

Latest Marathi News | Smart Investment benefits 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x