22 November 2024 12:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • Jio Finance Share PriceNSE: JIOFIN – जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग जाहीर
  • गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला
  • कंपनी चांगली कामगिरी करेल
  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्युच्युअल फंड
  • शेअर लिस्टिंग किमतीपेक्षा 40 टक्क्यांनी वाढला
Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर सध्या फोकसमध्ये आला आहे. कारण रिलायन्स ग्रुपच्या या कंपनीने (NSE: JIOFIN) नवीन क्षेत्रात प्रवेश केला आहे. स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यानंतर जेएफएसएल शेअर गुंतवणूकदारांच्या नजरेत आला आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.26 टक्के वाढून 343.95 रुपयांवर बंद झाला. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग जाहीर
दरम्यान, प्रसिद्ध ब्रोकरेज जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मच्या विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरसाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ज्ञांनी लॉन्ग टर्मसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची सल्ला देताना टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी 415 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.04 टक्के घसरून 342 रुपयांवर ट्रेड करत आहे.

गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला
पुढे तज्ज्ञ म्हणले की, जर गुंतवणूकदारांकडे 1-2 वर्षांचा संयम असेल तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये गुंतवणूक करावी. पण जर गुंतवणूकदारांना ही जोखीम पत्करायची नसल्यास जास्तीत जास्त २५% भांडवल गुंतवावे आणि शेअरच्या प्रोग्रेसवर लक्ष ठेवावे असं म्हटलं आहे.

कंपनी चांगली कामगिरी करेल
मूलभूत आधारावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा ताळेबंद वाढत आहे. ज्या प्रकारे ही कंपनी व्यवसायाचा विस्तार करत आहे आणि मंजुरी मिळवत आहे, त्याचा परिणाम गुंतवणूकदारांना ताळेबंदावर पहायला मिळेल. पुढे कंपनी चांगली कामगिरी करेल, असे देखील तज्ज्ञ म्हणाले.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्युच्युअल फंड
मागील आठवड्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने सांगितले की, सेबीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंट कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.

दरम्यान, मागील वर्षी जुलै महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉक कंपनीने म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यासाठी जिओ ब्लॅकरॉक (50:50) हा संयुक्त उपक्रम सुरु करण्याचा करार जाहीर केला होता. विशेष म्हणजे ब्लॅकरॉक ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक आहे.

शेअर लिस्टिंग किमतीपेक्षा 40 टक्क्यांनी वाढला
या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या 262 रुपयांच्या लिस्टिंग किमतीपेक्षा 40 टक्क्यांनी वाढले आहेत. आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,19,637 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x