Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी शेअर 3 महिन्यात 43% घसरला, पुढे काय, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
Highlights:
- Vodafone Idea Share Price – NSE: IDEA – व्होडाफोन आयडिया कंपनी अंश
- हा पेनी शेअर का घसरत आहे?
- तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Vodafone Idea Share Price | देशात प्रसिद्ध असलेली व्होडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनी सध्या संकटात सापडली आहे. 2024 वर्षात या शेअर्सच्या (NSE: IDEA) प्राईसमध्ये उच्चांकी पातळीवरून आजपर्यंत जवळपास 50% घसरण झाली आहे. तर बीएसईच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 8 ऑक्टोबरपर्यंत हा शेअर मागील 3 महिन्यांत 42.91% घसरला आहे. तर YTD आधारावर हा स्टॉक 44.32% इतका घसरला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
त्यामुळे सध्याच्या घडामोडींमुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. मात्र काही विश्लेषक ही स्टॉक स्वस्तात खरेदीची संधी असल्याचे देखील सांगत आहेत. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.71 टक्के वाढून 9.50 रुपयांवर बंद झाला. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.84 टक्के घसरून 9.23 रुपयांवर ट्रेड करत आहे.
हा पेनी शेअर का घसरत आहे?
सुप्रीम कोर्टाने एजीआर प्रकरणी कंपनीची पुनर्विचार याचिका फेटाळल्याने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या पेनी शेअरमध्ये घसरण सुरु झाली होती, ज्याला मंगळवारी ब्रेक लागला आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर कंपनीने सप्टेंबरमध्ये ७०,००० कोटी रुपयांच्या एजीआर थकबाकीवर दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे धाव घेतली होती. कारण, बँक गॅरंटी न भरल्याबद्दल कंपनीला भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून अधिकृत नोटीस मिळाली आहे. 2022 पूर्वी झालेल्या स्पेक्ट्रम थकबाकीसाठी बँक गॅरंटी वेळेत भरण्यास कंपनी अपयशी ठरली आहे.
नियमानुसार स्पेक्ट्रम लिलावाच्या थकबाकीवरील स्थगिती सप्टेंबर २०२५ मध्ये संपुष्टात येणार आहे आणि बँक गॅरंटी किमान एक वर्ष अगोदर सादर करावी लागते असा नियम आहे. येत्या काही महिन्यांतच या टेलिकॉम कंपनीला एकूण २४,७०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची बँक गॅरंटी केंद्र सरकारजमा करावी लागणार आहे. हेच शेअरमध्ये पडझड सुरु होण्यास कारण ठरलं आहे.
तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
सुप्रसिद्ध ब्रोकरेज फर्म नोमुराने मागील महिन्यात या पेनी शेअरची रेटिंग दुपटीने वाढवली होती. दुसरीकडे, टॉप ब्रोकरेज सिटी फर्मने देखील या पेनी शेअरवर सकारत्मक संकेत देताना २० रुपयाची टार्गेट जाहीर केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या २ आठवड्यांपूर्वी सिटीआय ब्रोकरेजने या पेनी शेअरवर BUY रेटिंग कायम ठेवत 17 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 09 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News