22 November 2024 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोन जवळ, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News

Highlights:

  • Suzlon Share PriceNSE: SUZLON – सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश
  • सुझलॉन एनर्जी कंपनीला ते पत्र प्राप्त झाले
  • सुझलॉन शेअर प्राईस घसरण्याची शक्यता
  • स्टॉकचे लार्ज कॅप म्हणून वर्गीकरण होणार?
Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सलग आठ ट्रेडिंग सेशन्समध्ये घसरल्याने गुंतवणूकदारांची (NSE: SUZLON) चिंता वाढली होती. बीएसई वेबसाईट’वरील अधिकृत आकडेवारीनुसार मागील आठवडाभरात हा स्टॉक 11% घसरला होता. मात्र मंगळवारी या पडझडीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं. बुधवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.16 टक्के वाढून 73.88 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 96,800 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.70 टक्के वाढून 77.10 रुपयांवर ट्रेड करत होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)

सुझलॉन एनर्जी कंपनीला ते पत्र प्राप्त झाले
बीएसई आणि एनएसईकडून सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला काही दिवसांपूर्वी पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार, सुझलॉन कंपनीचे स्वतंत्र संचालक मार्क डेसेडेलर यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धतींबाबत बीएसई आणि एनएसईकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पुढे असे प्रकार गांभीर्याने घेतले जातील, असं त्या पत्रात म्हटलं आहे. मात्र या सल्ल्याचा कंपनीच्या आर्थिक किंवा ऑपरेशनल क्रियाकलापांवर कोणताही थेट परिणाम होणार असं कंपनीने म्हटले आहे.

सुझलॉन शेअर प्राईस घसरण्याची शक्यता
मंगळवारी हा शेअर 73.6 रुपयांवर पोहोचला असला तरी तो 68 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो असा इशारा तज्ज्ञांनी यापूर्वीच दिला आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस आणि 50 दिवसांच्या सिंपल मूव्हिंग एव्हरेजच्या (एसएमए) खाली ट्रेड करत आहे. RSI देखील सध्या 41.76 वर आहे, जे दर्शविते की सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ आहे. परिणामी, येत्या काळात हा स्टॉक शेअर ६८ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

स्टॉकचे लार्ज कॅप म्हणून वर्गीकरण होणार?
प्रसिद्ध नुवामा अल्टरनेटिव्ह रिसर्च ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की सुझलॉन कंपनीला सुधारित लार्ज कॅप कट-ऑफ पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, जी सध्याच्या सरासरी बाजार-भांडवल पातळीच्या आधारे 84,000 कोटी रुपयांवरून सुमारे 1 ट्रिलियन रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, असं ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x