25 November 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News

Highlights:

  • IRB Infra Share PriceNSE: IRB – आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश
  • एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंग’मधील अपडेट
  • कंपनीच्या एकूण महसूल आणि संबधित राज्य
  • कंपनी अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली
  • आयआरबी इन्फ्रा कंपनीबद्दल
IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आज तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या (NSE: IRB) शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 5.74 टक्के वाढून 59.17 रुपयांवर बंद झाला होता. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.99 टक्के वाढून 60.08 रुपयांवर ट्रेड करत आहे. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी अंश)

एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंग’मधील अपडेट
दरम्यान, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने तिमाही निकालातील आकडेवारी जाहीर करताना म्हटले की, कंपनी आणि IRB इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टने सप्टेंबर 2024 मध्ये टोल महसुलात 19% वार्षिक वाढ नोंदविली आणि जी सप्टेंबर 2023 मधील 421 कोटी रुपयांच्या तुलनेत 502 कोटी रुपये झाली आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला गेल्या वर्षी याच महिन्यात टोल वसुली व्यवसायातून 421 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता, अशी माहिती आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने एक्स्चेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे.

कंपनीच्या एकूण महसूल आणि संबधित राज्य
महाराष्ट्र राज्यातील एकूण १७ टोलमधून आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या एकूण महसूल संकलनात १३६.८ कोटी रुपयांचा मोठा वाटा आहे, तर आयआरबी अहमदाबाद वडोदरा सुपर एक्स्प्रेस टोलवेने ५८.४ कोटी रुपयांचे योगदान दिले.

कंपनी अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली
दरम्यान, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे डेप्युटी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अमिताभ मुरारका अधिक माहिती देताना म्हणाले की, “राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील कंपनीच्या टोल महसुलात सकारात्मक लवचिकता दिसून आली आहे. सणासुदीच्या सीझनचा विचार केल्यास, वाढत्या प्रवास आणि आर्थिक क्रियाकलापांमुळे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी विकास दर कायम ठेवण्याबाबत आशावादी आहे असं म्हणाले.

आयआरबी इन्फ्रा कंपनीबद्दल
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी ही महामार्ग विभागातील देशातील पहिली इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक खाजगी टोल रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासक असून देशभरातील एकूण 12 राज्यांमध्ये 80,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आधार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x