16 October 2024 8:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपच्या पेनी शेअरने दिला 1200% परतावा, शेअर BUY करावा की Sell - NSE: ALOKIND GTL Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, रिलायन्स ग्रुपकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, स्टॉक रॉकेट होणार - BSE: 513337 IRFC Vs IREDA Share Price | IRFC ते IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, BUY करावा - NSE: IRFC Infosys Share Price | इन्फोसिस शेअर्स तेजीत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, दिला महत्वाचा सल्ला, संधी सोडू नका - NSE: INFY Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक होणार रॉकेट, व्होडाफोन-आयडिया कंपनीचा मोठा प्लॅन - NSE: IDEA Tata Motors Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा टाटा मोटर्स शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

Post Office Scheme | पोस्टाची 'ही' दमदार योजना खास महिलांसाठी, केवळ व्याजानेच कमवाल 32,000 रूपये - Marathi News

Post Office Scheme

Post Office Scheme | बचत करणे हा प्रत्येक महिलेचा आवडीचा विषय. म्हणूनच सरकारकडून पोस्टामार्फत (MSSC) म्हणजेचं ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ नावाची राबवली जात आहे. योजना केवळ महिलांसाठी असून, प्रत्येक महिलेला केलेल्या गुंतवणुकीवर तब्बल 32,000 रुपयांचा परतावा मिळवून देण्याची क्षमता आहे. चला तर मग जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती.

Mahila Samman Saving Certificate :
भारतामध्ये केंद्र सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. यामधील एक महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट या योजनेमध्ये आतापर्यंत अनेक महिलांनी पैसे गुंतवले आहेत. ही योजना 2025 सालच्या मार्च महिन्यापर्यंतच सुरू असणार आहे. योजनेचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून तुम्ही दोन लाखांची गुंतवणूक या महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेत करू शकता.

एवढी व्याजदर दिले जाते :
महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या या दमदार योजनेमध्ये 7.5% ने व्याजदर दिले जाते. जास्तीचे व्याजदर असल्यामुळे महिलांना व्याजदरानेच चांगली रक्कम कमवता येते. या योजनेचं खातं उघडण्यासाठी 18 वर्षांखालील नाबालिकांचे आई वडील किंवा कायदेशीररित्या असणारे पालक खात उघडण्यास मदत करू शकतात. त्याचबरोबर तुम्ही 2 वर्षांमध्ये केवळ 2 लाखांचीच गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर खातं उघडण्यासाठी तुम्ही 1000 रुपये भरून पैसे जमा करू शकता.

असे मिळतील या जाती 32,000 रूपये :
महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजनेमध्ये तुम्ही 2 वर्षाच्या मॅच्युरिटी पिरियडपर्यंत 2 लाखांची गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला 32,044 एवढे रुपये केवळ व्याजदराचेच मिळतील. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर मिळणारी एकूण रक्कम 2,32,044 रुपये एवढी असेल. योजनेमध्ये आणखीन एक सुविधा दिली जाते ती म्हणजे तुमच्या गुंतवणुकीला एक वर्ष झाल्यानंतर वेळे प्रसंगी 40 टक्के अमाऊंट तुम्ही काढून घेऊ शकता.

असं उघडा खातं :
महिलांसाठी उपलब्ध असणाऱ्या या योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी तुम्हाला जवळील बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल. त्यानंतर तुमच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे मागितली जातील आणि तुम्हाला एकच सर्टिफिकेट दिले जाईल. योजना पूर्ण संपेपर्यंत म्हणजेच 2 वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत तुम्हाला दिले गेलेले सर्टिफिकेट सांभाळून ठेवायचे आहे.

टॅक्स संबंधीत या गोष्टी माहीत करून घ्या :
पोस्टाच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलेला इन्कम टॅक्स सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स सूटचा लाभ मिळतो. दरम्यान योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर खातेधारकाचा अचानक मृत्यू झाला तर, जमा असलेले सर्व पैसे खातेधारकाचा नॉमिनी क्लेम करू शकतो. परंतु खातेदार मृत्युमुखी पावला नसेल आणि काही कारणांमुळे खातं दोन वर्षांच्या आत बंद करायचं असेल तर, व्याजाची रक्कम कमी केली जाते. इथे तुम्हाला 5.5% ने व्याजदर प्रदान केले जाते. त्याचबरोबर इंटरेस्टवर टीडीएस देखील कापला जातो आणि व्याजावर टॅक्स पेमेंट देखील केले जाते.

Latest Marathi News | Post Office Scheme 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x