16 October 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Alok Industries Share Price | रिलायन्स ग्रुपच्या पेनी शेअरने दिला 1200% परतावा, शेअर BUY करावा की Sell - NSE: ALOKIND GTL Share Price | शेअर प्राईस 13 रुपये, रिलायन्स ग्रुपकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, स्टॉक रॉकेट होणार - BSE: 513337 IRFC Vs IREDA Share Price | IRFC ते IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, BUY करावा - NSE: IRFC Infosys Share Price | इन्फोसिस शेअर्स तेजीत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, दिला महत्वाचा सल्ला, संधी सोडू नका - NSE: INFY Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक होणार रॉकेट, व्होडाफोन-आयडिया कंपनीचा मोठा प्लॅन - NSE: IDEA Tata Motors Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा टाटा मोटर्स शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News

Highlights:

  • IPO GMP
  • आयपीओ चा संपूर्ण तपशील
  • IPO शेअर प्राइस बँड
  • ग्रे मार्केट प्राइस
  • मर्चंट बँकर्स आणि निबंधक
  • वाटप आणि लिस्टिंग
IPO GMP

IPO GMP | मागील काही महिन्यात IPO गुंतवणुकीतून मोठी कमाई होत असल्याने लोकांनी IPO गुंतवणुकीला खूप महत्व दिलं आहे. अनेक IPO मध्ये गुंतवणूकदारांनी लिस्टिंगच्या दिवशीच मल्टिबॅगर कमाई केली आहे. त्यामुळे सध्या लोकं मार्केट मध्ये येणाऱ्या नवीन IPO कडे लक्ष लावून असतात.

आता तशीच मोठी संधी गुंतवणूकदारांसाठी पुन्हा चालून आली आहे. कारण दिग्गज ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने आयपीओ’चा तपशील जाहीर केला आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे.

आयपीओ चा संपूर्ण तपशील
दरम्यान, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ चा संपूर्ण तपशील समोर आला आहे. या आयपीओ मार्फत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनी एकूण १४.२ कोटी शेअर्सच्या विक्रीतून २७,८७० कोटी रुपये उभारणार आहे. ही संपूर्ण ऑफर फॉर सेल (OFS) असेल. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक ओएफएसमधील एकूण १४.२ कोटी शेअर्स विकणार आहेत. तर 14 ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनी अँकर गुंतवणूकदारांकडून फंड गोळा करणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

IPO शेअर प्राइस बँड
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनीने प्रति शेअर 1,865 ते 1,960 रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे. यामध्ये गुंतवणूकदार कमीत कमी 7 शेअर्सच्या पटीत (एक लॉट) आणि त्यानंतर 7 च्या पटीत बोली लावू शकतात. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ पैकी ५०% हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी), १५% बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एनआयआय) आणि ३५% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल अशी माहिती कंपनीने स्टॉक मार्केटला दिली आहे.

ग्रे मार्केट प्राइस
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओला ग्रे मार्केटमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या ग्रे मार्केटमध्ये तो 147 रुपये प्रति शेअर प्रीमियम भावाने ट्रेड करत आहे असं आकडेवारी सांगते. हा आकडा ग्रे-मार्केटमधील प्रीमियम इश्यू प्राइसपेक्षा 7.5% इतका जास्त असून तो आता तेजीने वाढेल असं म्हटलं जातंय.

मर्चंट बँकर्स आणि निबंधक
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनीने कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया), जेपी मॉर्गन इंडिया आणि मॉर्गन स्टॅनली इंडिया हे कंपनीचा आयपीओ हाताळणारे मर्चंट बँकर आहेत, तर केएफआयएन टेक्नॉलॉजीज रजिस्ट्रार आहेत अशी माहित देण्यात आली आहे.

वाटप आणि लिस्टिंग
ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड कंपनी १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अलॉटमेंटला अंतिम रूप देईल अशी अपेक्षा आहे. तसेच 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात इक्विटी शेअर्स हस्तांतरित केले जातील. आणि २२ ऑक्टोबररोजी कंपनीचे शेअर्स एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होतील अशी माहित देण्यात आली आहे.

Latest Marathi News | IPO GMP of Hyundai Motor India Ltd 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(101)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x