22 November 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम

Pension Life Certificate

Pension Life Certificate | सर्व पेन्शनकर्त्यांना आणि सुपर सीनियर सिटीजन नागरिकांना प्रत्येक वर्षी एक सर्टिफिकेट जमा करावा लागतो. सर्टिफिकेट चे नाव जीवन प्रमाणपत्र म्हणजेच टेन्शन लाईफ सर्टिफिकेट असं असून, हे सर्टिफिकेट वेळच्यावेळी पोस्टात किंवा बँकेमध्ये जमा केले नाहीत तर, तुमची पेन्शन थांबवली जाऊ शकते. नेमकी काय आहे पेन्शन लाईफ सर्टिफिकेट जाणून घ्या.

केंद्र सरकार प्रत्येक पेन्शनकर्त्याकडून प्रत्येक वर्षी जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी वेगवेगळे विकल्प देतात. या विकल्पांमुळे पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीला टेन्शन घेण्याची वेळ येणार नाही यासाठी हे प्रमाणपत्र जमा करणे अत्यंत गरजेचे असते. या बाबीची खास गोष्ट म्हणजे सुपर सीनियर सिटीजन व्यक्तींसाठी सर्टिफिकेट जमा करण्याचा कार्यकाळ सामान्यांपेक्षा वाढवून दिला आहे. सरकारने दिलेल्या टाईम लाईनच्याआधी तुम्ही जीवन प्रमाणपत्र जमा केलं नाही तर, तुमची पेन्शन थांबवली जाऊ शकते.

जीवन प्रमाण पत्राविषयी जाणून घ्या :
जीवन प्रमाणपत्र हे एक डिजिटल प्रमाणपत्र आहे. जे तुम्हाला घरबसल्या जमा करावं लागतं. हे पत्र तुमचा आधार नंबर आणि बायोमेट्रिक्सच्या मदतीने पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींना दिले जाते. त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकार आणि इतर सरकारी संघटनांतील पेन्शनलाभार्थी ही सुविधा अनुभव शकतात. या डिजिटल सर्टिफिकेटची सुविधा उपभोगण्यासाठी तुम्हाला डोअरस्टेप रजिस्टर करावं लागेल. डोरस्टेप रजिस्टर कशा पद्धतीने करावे. त्याचबरोबर जीवन प्रमाणपत्र फॉर्म कशा पद्धतीने भरावा आणि सबमिट करावा याबद्दल जाणून घ्या.

अशा पद्धतीने होईल डोअरस्टेप रजिस्ट्रेशन :
भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार पेन्शन लाभार्थी कोणत्याही डोअर स्टेप बँकिंग ऐप किंवा चायनल त्याचबरोबर वेब पोर्टल किंवा टोल फ्री नंबरवरून सर्विस बुक करू शकतात. सर्विस बुक केल्यानंतर डोअरस्टेप रजिस्टर एजंट पेन्शन लाभार्थ्याच्या घरी जाऊन ऑनलाइन पद्धतीने जीवन प्रमाणपत्र कलेक्ट करेल. ही गोष्ट देखील लक्षात ठेवा की, जोपर्यंत संपर्क केंद्राचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत डोअरस्टेप बँकिंग सर्विससाठी अपील होईपर्यंत होम ब्रांचमधून कराव लागेल.

अशा पद्धतीने खरा रजिस्टर :
1) सर्वप्रथम तुम्हाला डोअरस्टेप बँकिंग ॲप डाऊनलोड करून घ्यावा लागेल.

2) त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरून रजिस्टर करून घ्यावं लागेल.

3) त्यानंतर आमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी तुम्हाला एंटर करून घ्यायचा आहे.

4) एंटर केलेला ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून सर्व नियमांना स्वीकारायचं आहे.

5) एक्स्ट्रा माहिती भरण्यासाठी तुम्हाला पिनबरोबर ॲपमध्ये लॉगिन करावे लागेल.

6) पुढे ऍड्रेस हा ऑप्शन निवडून तुम्हाला संपूर्ण ऍड्रेस भरून घ्यायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा पत्ता लिहू शकता किंवा काढून टाकू शकता.

डेडलाईन जाणून घ्या :
या प्रमाणपत्राची डेडलाईन सर्वसामान्यांसाठी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुपर सीनियर सिटीजन नागरिकांसाठी प्रमाणपत्राची डेड लाईन 1 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत देण्यात आली आहे. म्हणजे ते ज्येष्ठ नागरिकांना जास्तीचे दिवस प्रमाणपत्र जमा करण्यास मिळत आहेत.

Latest Marathi News | Pension Life Certificate 09 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Pension Life Certificate(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x