22 November 2024 12:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI चा हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

Business Idea | रेल्वेसोबत स्वतःचा बिझनेस सुरु करण्याची संधी, केवळ 6,999 रुपये खर्च होतील - Marathi News

Business Idea

Business Idea | आपण आपल्या आई वडिलांच्या तसेच इतर वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तोंडून हे नक्कीच ऐकलं असेल की, रेल्वेमध्ये नोकरी मिळणे यासारखी सुवर्ण नोकरीची संधी कुठेच नाही. तुमच्या घरात देखील असं बऱ्याचदा बोललं गेलं असेल. किंवा रेल्वेचे फॉर्म भर, रेल्वेमध्ये नोकरी कशी लागेल याचा विचार कर अशा पद्धतीचे वाक्य किंवा बोलणे तुमच्या आमच्यापैकी सर्वांनी ऐकलं असेल. पण जाऊद्या, प्रत्येकाचं रेल्वेमध्ये जॉब करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु तुम्हाला संधी मिळू शकते ती म्हणजे रेल्वेची हात मिळवणी करून बिजनेस करण्याची.

तुम्ही बरोबर ऐकलं आता तुम्हाला रेल्वेमध्ये जॉब नाही तर, थेट रेल्वे बरोबर हात मिळवणी करून बिझनेस करण्याची संधी प्राप्त होऊ शकते. आता बिझनेस म्हटलं तर प्रत्येकजण डोक्याला हात लावतो. यासाठी की, बिझनेस कोणताही असो लाख, दीड लाख गुंतवणूक कुठेही नाही गेली. परंतु तुम्हाला या रेल्वेच्या बिजनेसमध्ये लाखोंची नाही तर केवळ काही हजारांची गुंतवणूक करून बिजनेस सुरू करायचा आहे. नेमका कोणता बिजनेस आहे पाहून घेऊ.

रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट :
तुम्ही रेल्वेच्या सहयोगी कंपनी आयआरसीटीसीचे रेल्वे एजंट बनवून चांगला बिजनेस करू शकता. यासाठी तुम्हाला रेल्वे टिकीटचे काम करावे लागेल. रेल्वे तिकीट कापल्यावर तुम्हाला थेट रेल्वे कडून कमिशन देखील देण्यात येईल. प्रवासी ज्या पद्धतीने रेल्वेचे तिकीट काढतात अगदी त्याचप्रमाणे तुम्ही घरबसल्या तुमच्या कम्प्युटरवर रेल्वेचे तिकीट कापू शकता. यामधून मिळणाऱ्या कमिशनवर तुम्ही तुमचा स्मॉल बिजनेस सुरू ठेवू शकता.

कमिशनमधून किती होईल कमाई :
समजा तुम्ही एखादी नॉन एसी कोच सीट बुक केली तर तुम्हाला, प्रत्येक सीटमागे 20 रुपये कमिशन मिळेल. हे कमिशन तुम्हाला तिकीटच्या हिशोबाने दिले जाते. त्याचबरोबर तुम्ही दिवसाला कितीही तिकीट कापू शकता. तिकिटांची प्रत्येक दिवसासाठी कोणतीही लिमिट दिली गेली नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही रेल्वेच्या या स्मॉल बिजनेसमध्ये कमी पैशांची गुंतवणूक करून चांगला फंड जमा करू शकता.

एजंट बनण्यासाठी मोजावी लागेल फी :
तुम्हाला रेल्वेचं एजंट बनायचं असेल तर तुम्हाला रेल्वेला फी द्यावी लागेल. समजा तुम्ही एका वर्षासाठी एजंट बनत असाल तर, 3999 रुपये फी द्यावी लागेल. त्याचबरोबर तुम्ही दोन वर्षांसाठी एजंट बनू इच्छित असाल तर, 6999 रुपये फी द्यावी लागेल.

Latest Marathi News | Business Idea 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Business Idea(70)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x