17 October 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल Horoscope Today | या 6 राशींसाठी उघडणार प्रेमाचे दरवाजे, चांगल्या जोडीदाराचा योग लाभेल, पहा तुमचे आजचे राशीभविष्य 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांनो, तुमची बेसिक सॅलरी 40, 50 की 60 हजार, DA सह एकूण पगार इतका वाढणार Senior Citizen Saving Scheme | महिना खर्चाची चिंता मिटेल, 'या' बचतीवर प्रत्येक 3 महिन्यांनी 1.20 लाख मिळतील, फायदाच फायदा Bank Account Alert | तुमच्या बँक सेविंग अकाउंटमध्ये पैसे जमा करण्याची लिमिट किती, लक्षात ठेवा नियम, अन्यथा अडचणी वाढतील Pension Life Certificate | पेन्शनर्ससाठी 'लाईफ सर्टिफिकेट' जमा करण्याची अतिशय सोपी पद्धत, घरबसल्या होईल काम IREDA Share Price | IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA
x

NHPC Share Price | NHPC स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News

Highlights:

  • NHPC Share PriceNSE: NHPC – एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
  • कंपनीची आर्थिक स्थिती
  • कंपनी प्रवर्तक आणि FII होल्डिंग्स
  • कंपनी बद्दल
NHPC Share Price

NHPC Share Price | PSU एनएचपीसी शेअर बुधवारी तेजीत होता. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.86 टक्के वाढून 92.33 रुपयांवर ट्रेड (NSE: NHPC) करत होता. बुधवारी सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीने देखील तेजी घेतली होती, पण काही वेळाने शेअर बाजारात अचानक घसरण झाली. प्रचंड चढ-उतारानंतर स्टॉक मार्केट घसरणीवर बंद झाला. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)

एनएचपीसी स्टॉक टेक्निकल चार्टनुसार, हा PSU स्टॉक 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग सरासरी तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग सरासरीच्या खाली ट्रेड करतोय. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.18 टक्के घसरून 91.05 रुपयांवर ट्रेड करत होता.

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
टॉप ब्रोकिंग फर्म प्रभुदास लिलाधरने या सरकारी कंपनीच्या शेअर्ससाठी BUY रेटिंग जाहीर केली आहे. तसेच खरेदीचा सल्ला देताना ११७ रुपयांच्या टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. आजच्या तारखेला एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 92,575 कोटी रुपये इतके आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती
30 जून 2024 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत NHPC कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न 3037.92 कोटी रुपये इतके होते, जे मागील तिमाहीतील एकूण उत्पन्न 2320.18 कोटी रुपयांच्या तुलनेत 30.93 टक्क्याने अधिक होते. कंपनीने ताज्या तिमाहीत ११०७.७५ कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा कमावला आहे असं आकडेवारी सांगते.

कंपनी प्रवर्तक आणि FII होल्डिंग्स
30 जून 2024 पर्यंत सरकारी NHPC लिमिटेड कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा 67.4% होता, तर FII’कडे 8.95%, तर DII कडे 10.26% हिस्सा होता.

कंपनी बद्दल
NHPC कंपनीची स्थापना १९७५ मध्ये झाली होती. PSU एनएचपीसी लिमिटेड ही एक लार्ज कॅप कंपनी असून या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 92,575 कोटी रुपये इतके आहे. NHPC लिमिटेड कंपनी ही वीज क्षेत्रात कार्यरत आहे. एनएचपीसी कंपनीच्या महसुलाचा मुख्य स्रोतांमध्ये वीज, इतर ऑपरेटिंग महसूल, लीज आणि इतर उत्पन्न, वित्त भाडेपट्ट्यांमधून उत्पन्न, प्रकल्प विकासातून उत्पन्न, स्क्रॅप आणि कंत्राटी महसूल यांचा समावेश आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NHPC Share Price 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NHPC Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x