22 November 2024 6:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका, 1 वर्षात 200% परतावा दिला - Marathi News

NBCC Share Price

NBCC Share Price | गुरुवारचा दिवस शेअर बाजारातही फायद्याचा ठरला आहे. सकारात्मक जागतिक संकेतानंतर भारतीय स्टॉक मार्केटमध्ये (NSE: NBCC) गुरुवारी जोरदार वाढ दिसून आली. गुरुवारच्या ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी निफ्टीने पुन्हा 25050 चा टप्पा ओलांडला आहे. तर सेन्सेक्सने देखील 200 अंकांची वरच्या दिशेने झेप घेतली. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड अंश)

कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली
दरम्यान, या तेजीत सरकारी कंपनीचा NBCC शेअर फोकसमध्ये आला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला ओडिशा राज्य सरकारकडून ५० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. या बातमीनंतर शेअर जोरदार तेजीत येण्याचे संकेत मिळाले आहेत. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.42 टक्के घसरून 115.67 रुपयांवर ट्रेड करत होता. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 31,185 कोटी रुपये आहे. NBCC स्टॉकने गुंतवणूकदारांना अवघ्या 1 वर्षात 200% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.

ऑर्डरचा तपशील
सरकारी कंपनी असलेल्या एनबीसीसी इंडिया लिमिटेडने ओडिशा राज्यातील भद्रक येथील धामनगर येथे एकात्मिक क्रीडा संकुल बांधण्यासाठी ओडिशा राज्य सरकारच्या क्रीडा आणि युवक सेवा विभागाकडून नुकताच महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळवला आहे. या ऑर्डरची किंमत ५० कोटी रुपये इतकी आहे. कंपनीने याबाबतची माहिती एक्सचेंजला फायलिंग मध्ये दिली आहे.

कंपनी बद्दल
भारत सरकारची मालकी असलेली एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी ही गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा एक नवरत्न उपक्रम आहे, ज्यात भारत सरकारचा 74.21% हिस्सा आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी प्रकल्प व्यवस्थापन, अभियांत्रिकी खरेदी, सल्लामसलत आणि बांधकाम-रिअल इस्टेट या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करते.

बोनस इश्यू
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या बोनस इश्यू कमिटीने बुधवारी, 9 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत 1 रुपयांच्या अंकित मूल्याचे 90 कोटी (900,000,000) पूर्णपणे पेड-अप बोनस इक्विटी स्टॉकचे वाटप केले आहे. फ्री बोनस इश्यू 1:2 च्या प्रमाणात आहे, याचा अर्थ असा आहे की सोमवार, दिनांक 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत शेअरहोल्डर्सकडे असलेल्या 1 रुपयांच्या दोन पूर्णपणे पेड-अप इक्विटी शेअर्ससाठी प्रत्येकी 1 रुपयांचा नवीन पूर्णपेड-अप बोनस इक्विटी शेअर जारी होईल.

शेअरहोल्डिंग पॅटर्न
एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार प्रवर्तकांचा कंपनीत ६१.७५%, तर पब्लिक किंवा रिटेल गुंतवणूकदारांचा हिस्सा २४.३५% आहे. तर FII आणि DII कडे अनुक्रमे 4.43% आणि 9.47% हिस्सा आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०२५ च्या जून तिमाहीत FII ने एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीत आपला हिस्सा ४.३३ टक्क्यांवरून ४.४३ टक्क्यांवर नेला आहे. आणि हा मोठा साकारात्मक संकेत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x