16 October 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Vs IREDA Share Price | IRFC ते IREDA सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, BUY करावा - NSE: IRFC Infosys Share Price | इन्फोसिस शेअर्स तेजीत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, दिला महत्वाचा सल्ला, संधी सोडू नका - NSE: INFY Vodafone Idea Share Price | 9 रुपयाचा पेनी स्टॉक होणार रॉकेट, व्होडाफोन-आयडिया कंपनीचा मोठा प्लॅन - NSE: IDEA Tata Motors Share Price | मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजचा टाटा मोटर्स शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Vedanta Share Price | वेदांता शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 132% वाढला, स्टॉक BUY करावा का - NSE: VEDL 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ, 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार - Marathi News NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Ratan Tata Passes Away | उद्योग रत्न काळाच्या पडद्याआड, 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News

Ratan Tata

Ratan Tata Passes Away | भारताचे सर्वात मोठे उद्योगपती त्याचबरोबर उद्योगाप्रमाणेच विशाल हृदय असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांमधून हरपलं आहे. उद्योगपती आणि ट्रस्ट टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली आहे.

रतन टाटा यांना वाढत्या वयाबरोबर अनेक आजार जडले होते. आजारामुळे त्यांना मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु आजारपणाशी दोन हात करताना रतन टाटा यांनी हॉस्पिटलमध्येच अखेरचा श्वास घेतला. यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. असंख्य संख्येने लोक रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहेत. आज प्रत्येकाच्या स्टेटसला आणि सोशल मीडियाला केवळ रतन टाटा यांच्या प्रतिमेचे फोटोज पाहायला मिळत आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांसारख्या दिग्गज नेत्यांनी रतन टाटा यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.

या कारणामुळे रतन टाटा यांना हॉस्पिटलाईज करण्यात आले होते :
माध्यमांच्या माहितीनुसार गेल्या सोमवारी रतन टाटा यांना ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागला होता. दरम्यान त्यांना चटकन ब्रिच कॅंडी रुग्णालय भरती करण्यात आली. अचानक त्यांचा ब्लड प्रेशर पूर्णपणे लो झाला अशी संपूर्ण माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. परंतु अशी देखील माहिती पसरत आहे की, रतन टाटा यांच्याकडून ही सर्व माहिती खोटी असल्याचं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं होतं. अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला असून संपूर्ण भारत हादरलं आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडिया अकाउंटवरून रतन टाटा यांच्यासाठी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्याबद्दल भल्या मोठ्या पोस्ट लिहत त्यांचं कौतुक केलं आहे. दरम्यान रतन टाटा यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वसामान्यांच्या मनाला ही गोष्ट अजूनही पटत नाहीये. केवळ सर्वसामान्य व्यक्तीच नाही तर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी देखील रतन टाटांची बातमी कळता दुःख व्यक्त केलं आहे.

सर्वसामान्यांसाठी केली भरपूर मदत :
रतन टाटांनी त्यांचा बिझनेस सांभाळत कायम सर्वसामान्य आणि खास करून मध्यमवर्गीय व्यक्तींचा जास्तीत जास्त प्रमाणात विचार केला आहे. त्यांच्या जीवनातले वेगवेगळे किस्से कोणीही विसरू शकत नाही त्याचबरोबर सर्वसामान्यांवर केलेले उपकार देखील भारताचा कोणताही नागरिक विसरू शकत नाही.

अमित शहा मुंबईसाठी रवाना :
केंद्र सरकारकडून अमित शहा रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी थेट दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाली आहेत. सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार नुकतेच ते मुंबईत येण्यासाठी तेथून निघाले आहेत. त्याचबरोबर संपूर्ण भारत रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी भावुक झाले आहेत.

Latest Marathi News | Ratan Tata Passes away 10 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ratan Tata(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x