22 November 2024 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: BHEL

Highlights:

  • BHEL Share PriceNSE:BHEL – भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली
  • BHEL हा ‘वंदे भारत’ लिंक्ड शेअर
  • भेल शेअर – टार्गेट प्राईस
  • 2 वर्षात 329% परतावा दिला
BHEL Share Price

BHEL Share Price | सरकारी कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा शेअर फोकसमध्ये आला आहे. शेअर बाजार विश्लेषकांनी (NSE:BHEL) हा शेअर तेजीत येणार असल्याचे संकेत दिले आहेत. स्टॉक मार्केट विश्लेषक कुणाल बोथरा यांनी PSU भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्ससाठी BUY रेटिंग दिली आहे. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश)

कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला नुकतीच ८०० मेगावॅट क्षमतेचा सिपत सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी जीएसटी वगळून ६१०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या आघाडीच्या वीजनिर्मिती करणाऱ्या PSU कंपनीकडून ही ऑर्डर मिळाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने एक्सचेंजला फायलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.68 टक्के घसरून 269.50 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे २.३१ लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे ट्रेड झाले.

BHEL हा ‘वंदे भारत’ लिंक्ड शेअर
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचा शेअर हा वंदे भारतशी संबंधित स्टॉक आहे. भारत हेवी इंजिनीअरिंग लिमिटेड आणि टिटागड रेल सिस्टिम्स लिमिटेड यांच्या कन्सोर्टियमने “सरकारी उत्पादन युनिट्स आणि ट्रेनसेट डेपोच्या अपग्रेडेशनसह 80 वंदे भारत ट्रेनसेटची निर्मिती सह देखभाल” साठी करारावर स्वाक्षरी केली आहे. कंपनीने एक्सचेंजला फायलिंग मध्ये माहिती देताना म्हटले आहे की, ’80 ट्रेनसेटची निर्मिती आणि पुढील 35 वर्षांसाठी त्यांची देखभाल करण्यासाठी कंत्राटमूल्य सुमारे 24000 कोटी रुपये आहे’.

भेल शेअर – टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञ आणि विश्लेषक कुणाल बोथरा यांनी भारत हेवी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. यासाठी कुणाल बोथरा यांनी २८२ रुपयांची टार्गेट प्राईस देताना त्यावर २६६ रुपये स्टॉप लॉस लावावा, असा सल्ला देखील दिला आहे.

2 वर्षात 329% परतावा दिला
भारत हेवी इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना YTD तत्त्वावर ३६.७५% परतावा दिला आहे. तसेच मागील 1 वर्षात 106.75%, मागील 2 वर्षात 329.53%, मागील 3 वर्षात 314.44%, मागील 5 वर्षात 314.44% आणि मागील 10 वर्षांत 84.14% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BHEL Share Price 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x