22 November 2024 7:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News

Post Office Interest Rate

Post Office Interest Rate | पोस्टाच्या अंतर्गत विविध योजना चालवल्या जातात. बरेच नागरिक इतर ठिकाणी पैसे गुंतवण्यापेक्षा पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे म्हणतात. कारण की पोस्टाची योजना सुरक्षित आणि योग्य व्याजदर प्रदान करते. जेणेकरून गुंतवणूकदाराला जास्तीचा नफा मिळवता येतो.

आज आपण या लेखातून पोस्टाच्या टाईम डिपॉझिट म्हणजे टीडी योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेला पोस्ट ऑफिस एफडी असं देखील म्हटलं जातं. पोस्टाच्या टाईम डिपॉझिटमध्ये तुम्हाला 1,2,3 आणि 5 वर्षांच्या टेन्योरवर एफडी ऑप्शन्स मिळतात. या टेन्योरमध्ये प्रत्येकावर वेगवेगळे व्याजदर आहे. जर तुम्हाला जास्तीची रक्कम जमा करायची असेल तर, तुम्ही 5 वर्षांच्या एफडचा विचार करू शकता. परंतु तुम्हाला ही एफडी 5 वर्षांच्या मॅच्युरिटी पिरियडआधी बंद करायची नाहीये. नाहीतर मोठे नुकसान सहन करावे लागेल.

मॅच्युरिटी पिरियडआधी बंद केल्यास होईल मोठे नुकसान :
तुम्हाला 5 वर्षांच्या टीडीवर चांगली रक्कम कमवायची असेल तर, टेन्योर संपण्याआधी स्कीम तोडू नका. नाहीतर तुमचे फार मोठे नुकसान होईल. टीडी योजनेच्या नियमानुसार पाच वर्षांची एफडी तुम्ही एका वर्षा आधी किंवा सहा महिन्यांआधीच तोडत असाल तर तुम्हाला व्याजाचे रिफंड केले जातात. सध्याच्या घडीला पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटवर 4% व्याजदर दिले जात आहे. दरम्यान तुम्ही प्री-मॅच्युअर क्लोजरचा वापर करत असाल तर, दिलेले व्याजदर दोन टक्क्यांनी कमी करून दिले जाईल.

5 लाखांचं कॅल्क्युलेशन पहा :
समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पोस्टाच्या टीडी योजनेत 5,00,000 लाखांची गुंतवणूक केली असेल तर, 7.5% व्याजदराने त्याला 2,24,974 एवढा व्याजदर मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीवर एकूण रक्कम 7,24,974 रुपये मिळतील.

जाणून घ्या पोस्ट ऑफिस टीडीची व्याजदरे :
1) 1 वर्षाच्या गुंतवणुकीवर 6.9% व्याजदर दिले जाते.
2) 2 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.0% व्याजदर दिले जाते.
3) 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.1% व्याजदर दिले जाते.
4) 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5% व्याजदर दिले जाते.

पोस्टाच्या टीडी योजनेबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या :
1) एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांच्या एफडीमध्ये पैसे गुंतवले तर, त्याला सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स सवलत मिळते.
2) पोस्टाच्या योजनेत तुम्ही 1000 रुपये भरून खातं उघडू शकता.
3) त्याचबरोबर या योजनेत तुम्ही तुम्हाला हवे तेवढे अकाउंट उघडू शकता.
4) पोस्टाच्या या योजनेत तुमच्या गुंतवणुकीवर तिमाही चक्रवाढ व्याज लागते. परंतु खात्यात जमा होण्याच्या वेळी तीन महिन्यांनी नाहीतर, 1 वर्षानंतर जमा होते.
5) 18 वर्षा पूर्ण झालेला कोणताही व्यक्ती पोस्टाच्या या टीडी योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
6) 10 वर्ष पूर्ण झालेली लहान मुले देखील पोस्टाच्या योजनेचा भाग होऊ शकतात. परंतु 10 वर्षाखालील कोणताही नाबालिक आपल्या आई वडिलांची मदत घेऊन पोस्टाच्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

Latest Marathi News | Post Office Interest Rate 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Post Office Interest Rate(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x