22 November 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर करणार मालामाल, मिळेल 42% परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केट मध्ये हलकी तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारातील तेजीमुळे अनेक शेअर्सची जोरदार खरेदी सुरु झाली आहे. टाटा ग्रुपचे शेअर्स (NSE: TATAMOTORS) सुद्धा तेजीत आहेत. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीत येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)

शेअरखान ब्रोकरेज फर्म – शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग
टॉप ब्रोकरेज फर्म शेअरखानने टाटा मोटर्स लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. हा शेअर गुंतवणूकदारांना ४२% परतावा दिला आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.18 टक्के घसरून 929 रुपयांवर पोहोचला होता.

शेअरखान ब्रोकरेज फर्मचा रिपोर्ट
शेअरखान ब्रोकरेज फर्म रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘आर्थिक वर्ष 2025 मध्ये टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी सकारात्मक सुधारणा करू शकते. त्यामुळे शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरवरील ‘BUY’ रेटिंग कायम ठेवली आहे. ब्रोकरेजच्या रिपोर्टनुसार, जग्वार लँड रोव्हरचे उत्पादन दुसऱ्या तिमाहीत घटणार आहे. तसेच, जागतिक मागणीत जग्वार लँड रोव्हरचे EBIT मार्जिन आर्थिक वर्ष 2025 मध्ये 8.5% राहण्याचा अंदाज शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

उत्पादन आणि होलसेल वॉल्यूममध्ये सुधारणा होईल
शेअरखान ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2025 च्या उत्तरार्धात जेएलआरचे उत्पादन आणि होलसेल वॉल्यूममध्ये जोरदार सुधारणा होईल अशी कंपनी व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.

शेअर 42% परतावा देणार
ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी टाटा मोटर्स शेअरसाठी 1319 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. टाटा मोटर्स शेअर गुंतवणूकदारांना 42% परतावा देऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

टाटा मोटर्स शेअरने दिला मल्टिबॅगर परतावा
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,42,580 लाख कोटी रुपये आहे. टाटा मोटर्स शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 1,179 रुपये होती. तर 52 आठवड्यांची निच्चांकी किंमत 621.85 रुपये होती. मागील 1 वर्षात टाटा मोटर्स शेअरने गुंतवणूकदारांना 47% परतावा दिला आहे. मागील दोन वर्षात या शेअरने 136% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Motors Share Price 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x