16 October 2024 2:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ, 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार - Marathi News NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC
x

Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांना, ट्रेन सुरु व्हायच्या 10 मिनिटं आधी देखील मिळेल कन्फर्म सीट, करा केवळ हे काम

Railway Ticket Booking

Railway Ticket Booking | सणासुदीच्या दिवसांमध्ये ट्रेनचे तिकीट मिळणे थोडे कठीण होऊन जाते. लाखो प्रवासी सणासुदीच्या काळात प्रवास करण्यासाठी बाहेर पडतात. परंतु प्रचंड प्रमाणात गर्दी आणि जास्त प्रवासी असल्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणे थोडे कठीण होते. परंतु रेल्वेच्या एका सुविधेमध्ये कोणत्याही प्रवाशाला अगदी 10 मिनिटांमध्ये आवडीचे तिकीट बुक करता येऊ शकते.

केवळ फेस्टिवल सीजनच नाही तर, इमर्जन्सीच्या काळात किंवा आपल्याला तातडीने एखाद्या शहरी जायचं असेल तर, कमी पैशांमध्ये सर्वसामान्यांना परवडणारा एकच पर्याय तो म्हणजे ट्रेन. तुम्ही अगदी 10 मिनिटांआधी देखील तिकीट बुक करू शकता.

दहा मिनिटांत तिकीट बुक करून हवं असेल तर, तुम्हाला रेल्वेच्या करंट तिकीट सुविधेचा लाभ घेता येऊ शकतं. त्याचबरोबर रेल्वेच्या या करंट तिकीट सुविधेबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

अशा पद्धतीने मिळेल 10 मिनिटात सीट :
1) करंट तिकीट सुविधामध्ये सामान्य तिकिटाच्या स्वरूपात मूल्य कमी आकरले जाते. म्हणजेच तुम्ही तुमच्या इमर्जन्सी काळात करंट तिकीट बुक करून स्वतःचा फायदा करून घेऊ शकता.

2) तुम्हाला करंट तिकीट बुक करायचं असेल तर, आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा स्टेशनवर उपलब्ध असणाऱ्या तिकीट काउंटरवरून देखील सीट बुक होऊ शकते.

3) करंट तिकीट सुविधेअंतर्गत तुम्हाला 3 ते 4 तास आधी तिकीट बुक करण्यासाठी परवानगी दिली जाते. करंट तिकीट सुविधांमध्ये तुम्हाला ट्रेनमधील रिकामी सीटे भरण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. यामुळे ट्रेन रिकामी देखील जात नाही त्याचबरोबर तुमचा आणि ट्रेनचा दोघांचाही सारख्या प्रमाणात फायदा होतो.

Latest Marathi News | Railway Ticket Booking 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Railway Ticket Booking(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x