24 November 2024 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Rashi Bhavishya | कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी 12 पैकी कोणत्या राशींना लाभणार धनलाभ, तुमची राशी कोणती पाहून घ्या

Rashi Bhavishya

Rashi Bhavishya | आज 16 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वत्र कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अनेक जण एकत्रित येऊन साजरा करतात. म्हणजेच आज अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी असून आज ध्रुव योग सकाळी 10 वाजून 9 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच भाद्रपद हे नक्षत्र सायंकाळी सात वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर आजचा राहू काळ दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. आज पौर्णिमेच्या दिवशी 12 राशींपैकी कोणत्या राशींना धनलाभ होणार आहे हे आम्ही सांगणार आहोत.

आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच आकाश दीपदान शरद पौर्णिमा असून शास्त्रात या शरद पौर्णिमेचे महत्व सांगितले गेले आहे.

12 राशींचे राशीभविष्य

1) मेष : मेष राशि असणाऱ्या व्यक्तींसाठी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचा आजचा दिवस अत्यंत आनंदमय जाणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींनी मिळालेली मिळकत आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वेळेचा सदुपयोग करणे देखील महत्त्वाचे आहे.

2) वृषभ : लहान प्रवास करावा लागेल, मनातील नकारात्मक विचार काढण्याचा प्रयत्न करा दिवस उत्तम जाईल, त्याचबरोबर जमिनीच्या कामांमधून लाभ होईल.

3) मिथुन : तज्ञांची भेट होईल, रखडलेली कामे मार्गी लागतील, दिवस अतिशय चांगला जाईल, आर्थिक परिस्थितीत बळ प्राप्त होईल.

4) कर्क : आजचा दिवस कर्क रशींसाठी अत्यंत सुखमय जाणार आहे. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, मुलांकडून गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे.

5) सिंह : सिंह राशि असणाऱ्या व्यक्तींना प्रवास करण्याची वेळ येऊ शकते. प्रवासादरम्यान स्वतःची काळजी घ्या इजा संभावते. वैचारिक स्थिरता ठेवणे गरजेचे आहे.

6) कन्या : कन्या राशि असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कौटुंबिक सहकार्य लाभेल. धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.

7) तुळ : तूळ राशींचे व्यक्ती आज नवीन कार्य सुरू करू शकतात. धनलाभ होण्याची मोठी शक्यता आहे. दिवसभरात एखादी मौल्यवान वस्तू मिळू शकते. तुमच्या विरोधकांना आज चांगलंच उत्तर मिळेल.

8) वृश्चिक : आज महत्त्वाचे पाऊल उचलताना विचारपूर्वक उचला. व्यवसायामध्ये आर्थिक बळ प्राप्त होईल. आज कामाचा प्रचंड ताण जाणवेल तरीसुद्धा डोकं शांत ठेवून संयम आणि रहा.

9) धनु : एखाद्या स्पर्धेमध्ये यश प्राप्त होईल, बहिण भावंडांचे सहकार्य लाभेल. हातात असणाऱ्या कामाचे मूल्य समजणे गरजेचे आहे. कामाचा कंटाळा करू नका.

10) मकर : कोणावरही जास्त विश्वास दाखवू नका. वैवाहिक जीवनाचा आणखीन सुखप्राप्ती होईल. आज आरोग्य थोडं अस्थिर असेल त्यामुळे काळजी घ्या.

11) कुंभ : जोडीदाराच्या मनात असणारे गैरसमज दूर होतील. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. देवाची उपासना करा पैशांचे यश प्राप्त होईल.

12) मीन : मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडण्यास मदत होईल. घरातील वस्तूंची खरेदी कराल. प्रवास उत्तम होईल, मानसिक शांतता लाभेल आणि धनलाभ होण्याचे देखील संकेत आहेत.

Latest Marathi News | Rashi Bhavishya 16 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Rashi Bhavishya(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x