22 November 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Senior Citizen Saving Scheme | महिना खर्चाची चिंता मिटेल, 'या' बचतीवर प्रत्येक 3 महिन्यांनी 1.20 लाख मिळतील, फायदाच फायदा

Senior Citizen Saving Scheme

Senior Citizen Saving Scheme | आई वडील जसजसे म्हातारे होत जातात तसतसे त्यांच्या म्हातारपणाची चिंता सतावत राहते. तुम्हाला देखील तुमच्या आई वडिलांच्या म्हातारपणासाठी निधी जमा करून ठेवायचं असेल तर, तुम्ही सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचा लाभ जरूर घेतला पाहिजे. योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही खाते उघडताना आई आणि वडील दोघांचं वेगवेगळे अकाउंट देखील उघडू शकता.

बऱ्याच व्यक्तींना आपल्या आई वडिलांसाठी त्यांच्या उतार वयाकरिता एखादा रेगुलर इन्कम सोर्स असावा असं वाटत असतं. यासाठी तुम्ही आत्तापासूनच गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये ग्राहकांना चांगले व्याजदर प्रदान केले जाते. व्याजामुळेच तुम्ही म्हाताऱ्या आई-वडिलांसाठी चांगला कॉपर जमा करून ठेवू शकता. या खात्यात पैसे गुंतवण्यासाठी 5 वर्ष दिले गेले आहेत. परंतु तुम्ही आणखीन 3 वर्षांसाठी योजना सुरू ठेवू शकता. मॅच्युरिटी पिरियड पूर्ण झाल्यानंतर तुम्ही संपूर्ण रक्कम काढून घेऊन पुन्हा नवीन अकाउंट तयार करून रेगुलर इन्कम सोर्स सुरू करू शकता.

जाणून घ्या योजनेचे व्याजदर आणि डिपॉझिट रुल :
सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये सध्याच्या घडीला 8.2% ने व्याजदर दिले जात आहे. या योजनेचे पैसे प्रत्येक तीन महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होत असतात. दरम्यान या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी हजार रुपये तर जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची रक्कम गुंतवू शकता. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असून तुम्ही तुमच्या घराजवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सीनियर सिटीजन सेविंग स्कीमच खातं उघडून घेऊ शकता.

टॅक्स सुविधा आणि तगडी सेफ्टी :
पोस्टाच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीममध्ये तुम्ही केवळ गुंतवणूकच नाही तर, गुंतवणुकी नंतर रेगुलर इन्कम सोर्स तुमच्या गुंतवणुकीला बनवू शकता. जेणेकरून प्रत्येक महिन्याला तुमच्या हातात एक ठराविक रक्कम येत राहील आणि त्यानुसार तुमचं बजेट देखील ठरत राहील. दरम्यान या योजनेमध्ये तुम्हाला टॅक्स सवलत देखील मिळते. इन्कम टॅक्स सेक्शनच्या 80C कलमा अंतर्गत 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला टॅक्स सूट मिळते.

योजनेमध्ये खातं उघडण्यास कोण कोण आहे पात्र :
1) एखाद्या व्यक्तीचे 60 वय वर्ष पूर्ण असेल तर तो व्यक्ती सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचे खाते उघडण्यास पात्र आहे.

2) पन्नास वर्षांपेक्षा जास्त आणि साठ वर्षांपेक्षा कमी असणारे रक्षा कर्मचारी देखील या योजनेमध्ये खातं उघडण्यास पात्र आहेत. परंतु यामध्ये रिटायरमेंट बेनिफिट मिळाल्यानंतर 1 महिन्यांच्या आतच गुंतवणूक करायची असते.

3) 55 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी असलेले रिटायर सिविलियन कर्मचारी देखील खातं उघडू शकतात. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला रिटायरमेंट बेनिफिट मिळण्याच्या एक महिन्याआधीच करावे लागेल.

4) अनिवासीय भारतीय सोबतच एनआयआर एचयुएफ योजनेमध्ये खाते उघडण्यास पात्र नाहीत.

प्रत्येक तीन महिन्यानंतर मिळतील 1.20 लाख रूपये कॅल्क्युलेशन पहा :

1) सिंगल खात्यात जमा करण्याची रक्कम – 30 लाख
2) मॅच्युरिटी पीरियड – 5 वर्ष
3) वार्षिक व्याजदर – 8.2%
4) तिमाही व्याजाची रक्कम – 60,150 रुपये
5) वार्षिक व्याजाची रक्कम – 2,40,600 रुपये
6) 5 वर्षातील एकूण व्याज – 12,03,000 रुपये
7) एकूण परतावा – 42,03,000 रुपये

1) दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये जमा करण्याची रक्कम – 60 लाख
2) मॅच्युरिटी पिरियड – 5 वर्ष
3) वार्षिक व्याजदर – 8.2%
4) तिमाही व्याजाची रक्कम – 1,20,300 रुपये
5) वार्षिक व्याजाची रक्कम – 2,81,200 रुपये
6) 5 वर्षांतील एकूण व्याजाची रक्कम – 24,06,000
7) एकूण परतावा – 84,06,000.

Latest Marathi News | Senior Citizen Saving Scheme 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Senior Citizen Saving Scheme(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x