17 October 2024 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत ब्रोकरेज रिपोर्ट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर पुन्हा तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - NSE: IREDA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL JP Power Vs Adani Power Share Price | जयप्रकाश पॉवर सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JPPOWER IRFC Share Price | IRFC सहित या दोन PSU शेअर्ससाठी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर काय परिणाम होणार - NSE: VEDL
x

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांनो, तुमची बेसिक सॅलरी 40, 50 की 60 हजार, DA सह एकूण पगार इतका वाढणार

7th Pay Commission

7th Pay Commission | दिवाळी आणि धनतेरससारख्या सणांपूर्वीच मोदी सरकारने बुधवारी देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजेच डीएमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यावेळी सरकारने डीएमध्ये 3 टक्के वाढ केली आहे, जी जुलैपासूनच लागू मानली जाईल.

बेसिक सॅलरी प्रमाणे वाढ होणार
सरकार दरवर्षी दोनवेळा महागाई भत्त्यात वाढ करते. एकदा जानेवारीत त्यात वाढ केली जाते आणि दुसरी जुलैमध्ये वाढते. डीएमधील वाढ नेहमीच कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर मोजली जाते. या महिन्याच्या अखेरीस तुमचा पगार येणार असला तरी 3% डीए सह तुम्हाला किती पैसे मिळतील याचा हिशोब जाणून घेऊया. त्यासाठी ४०, ५० आणि ६० हजार रुपये बेसिक सॅलरी विचारात घेतली आहे.

40 हजार बेसिक सॅलरी असल्यास
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४० हजार रुपये आहे आणि त्याला ३ टक्के डीए वाढीचा लाभ देण्यात आला आहे. अशा कर्मचाऱ्याच्या पगारात १२०० रुपयांची वाढ होणार आहे. सप्टेंबरपर्यंत जो पगार मिळत होता, त्यात आता १२०० रुपयांची भर पडणार आहे. एवढंच नाही तर ऑक्टोबरच्या पगारासोबत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत तुम्हाला 3 महिन्यांचा डीए म्हणजेच 3,600 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबरला सप्टेंबरच्या तुलनेत ४,८०० रुपये जास्त मिळतील, ज्यात एक महिन्याचा डीए आणि ३ महिन्यांची थकबाकी असेल.

50 हजार बेसिक सॅलरी असल्यास
आता जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये असेल तर 3 टक्के महागाई भत्ता म्हणजे ऑक्टोबरपासून त्याच्या पगारात 1,500 रुपयांची वाढ होईल. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये त्यांना ३ महिन्यांची थकबाकी म्हणजेच साडेचार हजार रुपये मिळणार आहेत, तर गेल्या महिन्याच्या तुलनेत त्यात सहा हजार रुपयांची वाढ होणार आहे.

60 हजार बेसिक सॅलरी असल्यास
ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार ६० हजार रुपये आहे, त्यांना महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केल्यानंतर दरमहा १८०० रुपये अधिक मिळणार आहेत. या अर्थाने ३ महिन्यांचा डीए म्हणजेच ५,४०० रुपये थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे, तर डीए ऑक्टोबरच्या पगारात वाढणार असून या महिन्याच्या पगारात एकूण ७,२०० रुपयांची वाढ होणार आहे.

Latest Marathi News | 7th Pay Commission 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#7th Pay Commission(159)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x