19 October 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांना, तिकीट बुकिंगचे नियम बदलले, IRCTC ने नियम बदलले, लक्षात घ्या, अन्यथा अडचण होईल Credit Card Alert | नव्यानेच क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसेल Post Office Scheme | पोस्टाच्या या 7 योजनांमध्ये पैसे गुंतवून व्हाल मालामाल, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक उचलू शकतात फायदा SBI Bank Account | आता SBI मध्ये उघडा झिरो बॅलन्स अकाउंट, ते सुद्धा नो पेनल्टी, फायदे जाणून घ्या - Marathi News HDFC Mutual Fund | कुबेर खजाना आहे ही योजना, 1 लाखावर दिला 1.95 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसे वाढवा - Marathi News Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News EPFO Passbook | नोकरदारांनो, महिना 25,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्यांना सुद्धा आरामात EPF चे 2 करोड रुपये मिळणार
x

Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News

Car Loan EMI

Car Loan EMI | नुकताच दसरा हा सण पार पडला असून अनेकांनी दसऱ्याच्या निमित्ताने नवनवीन वस्तू खरेदी केल्या. अशातच आता दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन फराळ त्याचबरोबर फुलबाजा उडवत सण साजरा करतो. दरम्यान दिवाळीमध्ये आपण नवनवीन वस्तू देखील खरेदी करतो.

तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा हे पाहिलं असेल की, दिवाळी किंवा इतर फेस्टिवल दिवसांमध्ये घरातील वस्तू त्याचबरोबर कार, एसी, रेफ्रिजरेटर यांसारख्या अनेक वस्तूंवर विविध शॉपमध्ये दिवाळीनिमित्त ऑफर सुरू असते. त्यामुळे दिवाळीमध्ये या मोठ्या वस्तू खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात असते. प्रत्येकाला आपली सुद्धा स्वतःची हक्काची कार असावी असं वाटतं. परंतु बरेचजण ईएमआयवर कार घेण्यास घाबरतात. आज आम्ही तुम्हाला ईएमआयवर कार घेऊन लवकरात लवकर लोन कसं फेडता येईल याचे उपाय सांगणार आहोत. चला तर पाहूया.

1) कार लोन घेण्याआधी लोनबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या :
बऱ्याच व्यक्ती लोन तर घेतात परंतु त्याचं व्यवस्थित नियोजन करायला जमत नाही. नियोजनासाठी तुम्हाला लोनबाबतची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही लोन व्यतिरिक्त एक्स्ट्रा कोणकोणते चार्जेस आहेत याची माहिती काढली पाहिजे. एकदा माहिती झाली की तुम्ही लोन भरण्यासाठी व्यवस्थित स्ट्रॅटर्जी आखून लोन फेडू शकाल.

2) कार लोन स्किप करू नका :
लोनवर कार घेतल्यानंतर तुम्ही कोणत्याही महिन्याला तुमचा ईएमआय स्किप होणार नाही याची विशेष काळजी घ्या. समजा तुमचा लोन EMI काही कारणांमुळे स्कीप झाला तर तुम्हाला एक्सट्रा चार्जेस त्याचबरोबर जास्त वेळापर्यंत लोन भरावे लागू शकते.

3) जास्तीत जास्त एक्सट्रा पेमेंट करण्याकडे लक्ष द्या :
कार लोन घेतल्यानंतर तुम्ही शक्य तेवढे जास्त एक्स्ट्रा पेमेंट करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त लोन फेडत गेलात तर, व्याजाची रक्कम देखील कमी होऊ शकते. लोन फेडण्यासाठी तुमच्याकडे जेव्हाही जास्तीचा पैसा येईल किंवा बोनसच स्वरूपी पैसे प्राप्त होतील तेव्हा चटकन लोन फेडण्याकडे लक्ष द्या.

4) एक्स्ट्रा खर्च कमी करा :
तुमच्या कारचे संपूर्ण लोन फिटेपर्यंत तुम्ही तुमचे एक्स्ट्रा खर्च बाजूला ठेवले पाहिजे. पैसा कुठे जोडला जाईल, कोणता खर्च कमी बजेटमध्ये करता येईल या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन पैसे जमा करा आणि लवकरात लवकर लोन ईएमआय फेडण्याकडे लक्ष द्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Car Loan EMI 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Car Loan EMI(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x