22 November 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | मागील काही दिवसांपासून रेल्वे संबंधित शेअर्समध्ये चढ-उतार सुरु (NSE: RVNL) आहेत. दुसरीकडे, RVNL, IRFC, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आहे. बुधवारी RVNL शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. गुरुवार 17 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.27 टक्के वाढून 490.50 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.17 टक्के घसरून 479 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

कंपनीला २७० कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
मीडिया रिपोर्टनुसार, रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टचे मूल्य २७० कोटी रुपये आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावली होती. त्यानंतर हा कॉन्ट्रॅक्ट आरव्हीएनएल कंपनीला देण्यात आला. या बातमीनंतर आरव्हीएनएल शेअर्स तेजीत आले आहेत. हा कॉन्ट्रॅक्ट दिल्याच्या तारखेपासून ३० महिन्यांच्या आत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला हे काम पूर्ण करावे लागेल.

प्रकल्पाबद्दल अधिक तपशील
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मिळालेल्या या प्रकल्पात रिच 3A मध्ये हिंगणा माऊंट व्ह्यू, वानाडोंगरी, राजीव नगर, APMC, रायपूर हिंगणा बस स्थानक आणि हिंगणा या ७ एलिव्हेटेड मेट्रो स्थानकांच्या बांधकामाचा समावेश आहे. तसेच पारडी, ट्रान्सपोर्ट नगर आणि कापसी खुर्द येथे रिच 4A मध्ये ३ एलिव्हेटेड स्टेशन बांधण्यात येणार आहेत.

ईस्ट कोस्ट रेल्वे प्रकल्प
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला तालचेर रोड आणि जरापाडा दरम्यान तिसरी आणि चौथी लाइन आणि एमसीआरएल इंटरनल कॉरिडॉर फेज -1 दुहेरीकरण प्रकल्पाचा भाग असलेल्या अंगुल-बलराम दरम्यान नवीन लाइनच्या बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावली होती. हा प्रकल्प ईस्ट कोस्ट रेल्वे प्रकल्प म्हणून ओळखला जातो.

शेअरने दिलेला परतावा
रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरने मागील ५ दिवसांत ६% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यांत ९२% परतावा दिला आहे. २०२४ वर्षात आतापर्यंत या शेअरने १७५% टक्के परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने १९३% परतावा दिला आहे. मागील 5 वर्षात या शेअरने 2005% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x