18 October 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | PSU एनबीसीसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील ६ महिन्यात 32% परतावा दिला (NSE: NBCC) आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.63 टक्के घसरून 108.50 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 29,797 कोटी रुपये आहे. (एनबीसीसी लिमिटेड कंपनी अंश)

कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली
एनबीसीसी लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये म्हटले आहे की, ‘१० ऑक्टोबर रोजी एनबीसीसी लिमिटेड कंपनीला झारखंडमधील बोकारो स्टील प्लांटमध्ये डिझाइन, पुरवठा, रूफटॉप सोलर आणि इन्स्टॉलेशन सिस्टीमसाठी १९८ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

कंपनीला दोन कॉन्ट्रॅक्ट मिळाले
हिंदुस्थान स्टीलवर्क्स कन्स्ट्रक्शन या उपकंपनीच्या माध्यमातून १,००० कोटी रुपयांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्ट मध्ये महाराष्ट्रातील गोंडवाना विद्यापीठात कॅम्पस डेव्हलपमेंटचा समावेश आहे.

एनबीसीसी लिमिटेड कंपनीला ११ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 32.76 कोटी आणि ३२.३६ कोटी रुपयांचे दोन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. 32.76 कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये पूर्व दिल्ली जेएनव्ही’साठी कायमस्वरूपी कॅम्पस बांधणे या कामाचा समावेश आहे. तर ३२.३६ कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये दिल्ली शहादरा जेएनव्ही’साठी कायमस्वरूपी कॅम्पस बांधणे या अतिरिक्त कामाचा समावेश आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीची एकूण ऑर्डरबुक 1263.15 कोटी रुपयांची आहे.

तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
ट्रेंडलिनच्या रिपोर्टनुसार, एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 4 स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. या तज्ज्ञांच्या मते पुढील 1 वर्षात NBCC शेअर 14% घसरून 97 रुपयांवर जाऊ शकतो असं म्हटलं आहे. तसेच अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने एनबीसीसी शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग देताना हा शेअर ३० रुपयांपर्यंत घसरू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.

शेअरने दिलेला परतावा
एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर मागील ६ महिन्यात 32% परतावा दिला होता. मागील १ वर्षात या शेअरने 154% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 346% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 101% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(46)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x