22 October 2024 10:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | गुरु आणि शनीच्या वक्र स्थानामुळे 'या' राशीचे व्यक्ती होणार मालामाल, अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो Monthly Pension | पगारदारांना महिना 2 लाख रुपये पेन्शन मिळेल, महागाईत खर्चाची चिंता मिटेल, योजनेचा फायदा घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, 4 पटीने पैसा वाढून परतावा मिळेल, फक्त फायदाच फायदा PPF Calculator | PPF योजनेतील बचत मॅच्युअर होऊन देखील व्याज मिळत राहील, या योजनेचे फायदे समजून घ्या - Marathi News SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या या योजनेत गुंतवणुक करा, 20 हजाराचे बनतील 28 लाख रुपये, फायदाच फायदा Infosys Share Price | इन्फोसिस शेअर खरेदीचा सल्ला, रॉकेट तेजीचे संकेत, 2200 रुपयांचा टार्गेट स्पर्श करणार - NSE: INFY BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर मोठी झेप घेणार, फायद्याची अपडेट आली, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: BEL
x

RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर करणार मालामाल, 1 वर्षात 190% परतावा दिला - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | केंद्र सरकारच्या मालकीच्या रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार (NSE: RVNL) तेजी आहे. गुरुवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 7% वाढला होता. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीकडून नवीन कॉन्ट्रॅक्टबद्दल माहिती समोर आल्यानंतर शेअर्समध्ये तेजी आली होती. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.36 टक्के घसरून 478.05 रुपयांवर पोहोचला होता. (रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश)

कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रकल्पासाठी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने सर्वात कमी बोली लावली होती आणि त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट RVNL कंपनीला देण्यात आला आहे. एमएमआरसी’च्या या प्रकल्पासाठी २७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला हा प्रकल्प कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याच्या तारखेपासून ३० महिन्यांमध्ये पूर्ण करायचा आहे.

RVNL कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला 270 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मिळालेल्या नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा दोनच्या रीच 3A मध्ये हिंगणा माऊंट व्ह्यू, राजीव नगर, एपीएमसी, वानाडोंगरी, रायपूर, हिंगणा स्टेशन आणि हिंगणा बस स्थानक सह 7 एलिव्हेटेड मेट्रो स्थानकांच्या बांधकामांचा या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश आहे. तसेच कापसी खुर्द, ट्रान्सपोर्ट नगर आणि पारडी येथील रिच 4A मध्ये 3 एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने एक्सचेंजला फायलिंगमध्ये याबाबत माहिती दिली आहे.

RVNL शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.57 टक्के घसरून 477 रुपयांवर पोहोचला होता. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 647 रुपये होता, तर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 142.15 रुपये होता. रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 99,476 कोटी रुपये आहे.

RVNL शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
रेल्वे विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. मात्र मागील १ महिन्यात हा शेअर 9.78% घसरला आहे. मागील ६ महिन्यांत RVNL शेअरने 83.49% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात RVNL शेअरने 185.57% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1908% परतावा दिला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 162.03% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x