19 October 2024 9:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांनो, 35 हजारा पगार असणाऱ्यांना EPF कडून 2 कोटीचा रिटायरमेंट फंड मिळेल, अपडेट नोट करा Manoj Jarange Patil | जरांगे पाटील यांनी प्रचंड मेहनत केली, पण एक चुकीचा निर्णय त्यांचा 'अण्णा हजारे' करून जाईल - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांना, तिकीट बुकिंगचे नियम बदलले, IRCTC ने नियम बदलले, लक्षात घ्या, अन्यथा अडचण होईल Credit Card Alert | नव्यानेच क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसेल Post Office Scheme | पोस्टाच्या या 7 योजनांमध्ये पैसे गुंतवून व्हाल मालामाल, महिला तसेच ज्येष्ठ नागरिक उचलू शकतात फायदा SBI Bank Account | आता SBI मध्ये उघडा झिरो बॅलन्स अकाउंट, ते सुद्धा नो पेनल्टी, फायदे जाणून घ्या - Marathi News HDFC Mutual Fund | कुबेर खजाना आहे ही योजना, 1 लाखावर दिला 1.95 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसे वाढवा - Marathi News
x

EPFO Passbook | पगारदारांनो, 35 हजारा पगार असणाऱ्यांना EPF कडून 2 कोटीचा रिटायरमेंट फंड मिळेल, अपडेट नोट करा

EPFO Passbook

EPFO Passbook | सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य सुख समाधानात जावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. त्यासाठी ईपीएफओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफ स्वरूपात रिटायरमेंटपर्यंत प्रत्येक महिन्याला रक्कम जमा केली जाते. रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी तुमच्याजवळ एक रेगुलर इन्कम सोर्स किंवा पर्याप्त खंड असणे अत्यंत गरजेचे आहे.

एखाद्या व्यक्तीने आत्तापासूनच रिटायरमेंट फंडसाठी विचार केला तर कमीत कमी 2 करोड रुपयांचा कॉर्पस गरजेचा आहे. अशातच तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, रिटायरमेंटपर्यंत आम्हाला एकूण किती फंड जमा करता येईल. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आज या लेखामध्ये सापडतील. चला तर मग कॅल्क्युलेशन पाहूया

ईपीएफ म्हणजे काय :
ईपीएफचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला माहीतच आहे. तरीसुद्धा साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, ईपीएफ हे कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटनंतरचा आयुष्य सुखकर बनवण्यासाठी असते. जे ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन या संस्थेअंतर्गत चालवले जाते. ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्याला त्याच्या बेसिक सॅलरीतून एक भाग ईपीएफ खात्यामध्ये ट्रान्सफर करावा लागतो. त्याचबरोबर कर्मचारी इतकेच योगदान कंपनीदेखील करते. एवढेच नाही तर सध्याच्या घडीला या अकाउंटवर 8.25% ने व्याजदर दिले जात आहे. या खात्यामध्ये तुम्ही 25 व्या वर्षापासून गुंतवणूक करू शकता.

35,000 बेसिक पगार आणि जमा होणारा फंड 2 करोड. कॅल्क्युलेशन जाणून घ्या :
1) बेसिक सॅलरी + DA : 35,000
2) कर्मचाऱ्यांचे वय वर्ष : 25
3) रिटायरमेंटचे वय : 60
4) कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान : 12%
5) कंपनीकडून होणारे योगदान : 3.67%
6) वार्षिक इन्क्रिमेंट : 5%
7) पीएफवर मिळणारे वार्षिक व्याज : 8.25%
8) एकूण योगदानाची रक्कम : 63,07,473
9) रिटायरमेंटपर्यंत मिळणारा एकूण फंड : 2,53,46,410 रूपये.

डिपॉझिटचे काही नियम देखील जाणून घ्या :
ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्या त्याच्या बेसिक सॅलरीतील 12% योगदान करावे लागते. ज्यामध्ये महागाई भत्ता देखील समावेश असतो. कंपनीकडून होणाऱ्या योगदानात ईपीएस मध्ये 8.33% तर, ईपीएफ मध्ये 3.67% रक्कम जमा केली जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x