22 November 2024 11:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

EPFO Passbook | पगारदारांनो, 35 हजारा पगार असणाऱ्यांना EPF कडून 2 कोटीचा रिटायरमेंट फंड मिळेल, अपडेट नोट करा

EPFO Passbook

EPFO Passbook | सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य सुख समाधानात जावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. त्यासाठी ईपीएफओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये पीएफ स्वरूपात रिटायरमेंटपर्यंत प्रत्येक महिन्याला रक्कम जमा केली जाते. रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यासाठी तुमच्याजवळ एक रेगुलर इन्कम सोर्स किंवा पर्याप्त खंड असणे अत्यंत गरजेचे आहे.

एखाद्या व्यक्तीने आत्तापासूनच रिटायरमेंट फंडसाठी विचार केला तर कमीत कमी 2 करोड रुपयांचा कॉर्पस गरजेचा आहे. अशातच तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की, रिटायरमेंटपर्यंत आम्हाला एकूण किती फंड जमा करता येईल. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आज या लेखामध्ये सापडतील. चला तर मग कॅल्क्युलेशन पाहूया

ईपीएफ म्हणजे काय :
ईपीएफचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला माहीतच आहे. तरीसुद्धा साध्या सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, ईपीएफ हे कर्मचाऱ्यांसाठी रिटायरमेंटनंतरचा आयुष्य सुखकर बनवण्यासाठी असते. जे ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन या संस्थेअंतर्गत चालवले जाते. ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्याला त्याच्या बेसिक सॅलरीतून एक भाग ईपीएफ खात्यामध्ये ट्रान्सफर करावा लागतो. त्याचबरोबर कर्मचारी इतकेच योगदान कंपनीदेखील करते. एवढेच नाही तर सध्याच्या घडीला या अकाउंटवर 8.25% ने व्याजदर दिले जात आहे. या खात्यामध्ये तुम्ही 25 व्या वर्षापासून गुंतवणूक करू शकता.

35,000 बेसिक पगार आणि जमा होणारा फंड 2 करोड. कॅल्क्युलेशन जाणून घ्या :
1) बेसिक सॅलरी + DA : 35,000
2) कर्मचाऱ्यांचे वय वर्ष : 25
3) रिटायरमेंटचे वय : 60
4) कर्मचाऱ्याकडून होणारे योगदान : 12%
5) कंपनीकडून होणारे योगदान : 3.67%
6) वार्षिक इन्क्रिमेंट : 5%
7) पीएफवर मिळणारे वार्षिक व्याज : 8.25%
8) एकूण योगदानाची रक्कम : 63,07,473
9) रिटायरमेंटपर्यंत मिळणारा एकूण फंड : 2,53,46,410 रूपये.

डिपॉझिटचे काही नियम देखील जाणून घ्या :
ईपीएफ खात्यात कर्मचाऱ्या त्याच्या बेसिक सॅलरीतील 12% योगदान करावे लागते. ज्यामध्ये महागाई भत्ता देखील समावेश असतो. कंपनीकडून होणाऱ्या योगदानात ईपीएस मध्ये 8.33% तर, ईपीएफ मध्ये 3.67% रक्कम जमा केली जाते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Passbook 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Passbook(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x