21 October 2024 9:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Invesco Mutual Fund | वेगाने पैसा दुप्पट करणारी म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा झटपट वाढेल, अधिक जाणून घ्या EVM Machine | मी टेक्नॉलॉजिस्ट आहे, EVM मशीनने निवडणुकीत घोटाळा करता येतो, ही यंत्रे विशिष्ट ठिकाणी वापरली जातात NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: NTPC My EPF Money | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, बोनस वाढीसह EPF वर मिळणार जास्तीचा इन्शुरन्स कव्हर, अधिक जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, रॉकेट स्पीडने कमाई होणार, संधी सोडू नका - NSE: BHEL SBI Salary Account | सॅलरी अकाउंटवर मिळतात अनेक सुविधा, फार कमी लोकांना माहित, मिळतात अनेक फायदे - Marathi News Multibagger Stocks | श्रीमंत करतोय हा शेअर, यापूर्वी दिला 11000% परतावा, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: SHRIRAMFIN
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीस सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. तसेच दिवाळीला आता काही दिवसच उरले आहेत. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये एक तासासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंगचे आयोजन करण्यात येते. त्याच मुहूर्तावर मोठी संधी चालून आली आहे.

आनंद राठी ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
आनंद राठी ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी ३ शेअर्सची यादी जारी केली आहे. या दिवाळीत गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हे शेअर्स जोडू शकतात. तांत्रिक आधारावर आनंद राठी ब्रोकरेज फर्मने या शेअर्सची निवड केली आहे. आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या मते हे ३ शेअर्स पुढील १ वर्षात गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. आनंद राठी ब्रोकरेज फर्मकडून या शेअर्सची टार्गेट प्राईस देखील जाहीर करण्यात आली आहे.

हिंदुस्थान झिंक लिमिटेड – टार्गेट प्राईस
हिंदुस्थान झिंक लिमिटेड कंपनी शेअर 780 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर घसरत होता. मात्र, हिंदुस्थान झिंक लिमिटेड कंपनी शेअरला 470 रुपयांच्या पातळीवर मजबूत सपोर्ट आहे. हिंदुस्थान झिंक शेअर लवकरच ब्रेकआउट देईल असे संकेत आनंद राठी ब्रोकरेज फर्मने दिले आहेत. या शेअरमध्ये पुढील १ वर्षाच्या उद्देशाने गुंतवणूक करावी असा सल्ला आनंद राठी ब्रोकरेज फर्मने दिला आहे. त्यासाठी 680 ते 750 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड – टार्गेट प्राईस
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरने गेल्या वर्षी सूचिबद्ध होताच मोठा परतावा दिला होता. स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होताच या शेअरने 1,400 रुपयांचा उच्चांक गाठला होता. परंतु त्यानंतर शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर सध्या 1,059.90 रुपयांवर आहे. मात्र, हा शेअर लवकरच ब्रेकआउट देईल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देताना, आनंद राठी ब्रोकरेज फर्मने 1360 ते 1450 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड – टार्गेट प्राईस
मार्च ते जुलै 2024 दरम्यान गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचा शेअर 700 रुपयांवरून 1,000 रुपयांपर्यंत वाढला. मात्र मागील काही महिन्यांपासून हा शेअर घसरला आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी शेअर उच्चांकावरून 45% घसरला आहे. आता हा शेअर तेजीत येण्याचे संकेत दिसत आहेत. आनंद राठी ब्रोकरेज फर्मने हा शेअर एका वर्षासाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी तज्ज्ञांनी 2425 ते 2650 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x