22 November 2024 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Credit Card Alert | नव्यानेच क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर 'या' गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसेल

Credit Card Alert

Credit Card Alert | सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रत्येकजण पेमेंट, बिल भरण्यासाठी किंवा इतर ट्रांजेक्शनसाठी क्रेडिट कार्डचा वापर करू लागले आहेत. दरम्यान क्रेडिट कार्डवर तुम्हाला शॉर्ट टम लोन देखील दिले जाते. घेतलेले लोण फेडण्यासाठी तुम्हाला सेपरेटर टाईम पिरियड देखील दिला जातो. एवढेच नाही जर तुम्ही दिलेल्या वेळेमध्ये लोन फेडलं तर, तुमच्याकडून कोणताही प्रकारचे व्याजदर घेतले जात नाहीत. या सर्व सुविधांचा लाभ अनुभवता येत असल्यामुळे अनेकांना क्रेडिट कार्ड वापरणे सुरक्षिततेचे आणि फायदेचे वाटते.

परंतु तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात केली असेल तर, काही खास गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला पश्चाताप सहन करावा लागेल. चला तर जाणून घेऊया त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत.

क्रेडिट कार्डच्या लिमिटचा 30 टक्क्यांपेक्षा जास्त वापर करू नका :
तुम्ही खरेदी केलेल्या क्रेडिट कार्डची कितीही जास्त लिमिट असेल तरीसुद्धा 30 टक्क्यांपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका. तुम्ही असं केलं तर तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. सिबिल स्कोरवर परिणाम झाल्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठे लोन घेण्यास अडचणी निर्माण होतील. एकाच वेळेस भरघोस रक्कम खर्च केल्याने बँक तुम्हाला आर्थिक रूपाने कमजोर समजू लागेल. त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या.

पैसे काढू नका :
तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही गोष्ट ठाऊक असेल की, क्रेडिट कार्डमधून तुम्ही कॅश काढू शकता. कॅश काढण्याची लिमिट दिली गेली असते. परंतु तुम्ही कॅश काढण्यापासून वाचलं पाहिजे. कारण की, क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागतो. हा चार्ज साधासुधा नसून तुम्हाला चांगला फटका देखील बसू शकतो. त्यामुळे पैसे काढण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू नका.

इंटरनॅशनल ट्रांजेक्शन करण्यापासून वाचा फायदा होईल :
तुम्ही क्रेडिट कार्डमधून इंटरनॅशनल ट्रांजेक्शन केले नाही पाहिजे. बाहेरील देशांत हे क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी लोकांना विविध ऑफर्स दिल्या जातात. परंतु यामध्ये नेमकं काय असतं हे तुम्हाला सांगण्यात येत नाही. त्याचबरोबर तुम्ही बाहेरील देशात क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्याकडून फॉरेन करन्सीमधून चार्जेस आकारले जातात. त्यापेक्षा तुम्ही प्रीपेड कार्डचा वापर करू शकता.

अचानक कार्ड बंद करू नका :
तुम्ही आधीपासूनच क्रेडिट कार्ड वापरत आहात त्याचबरोबर तुमच्याकडे एकापेक्षा अनेक क्रेडिट कार्ड आहेत. तर, तुम्ही अचानकपणे क्रेडिट कार्ड बंद नाही केले पाहिजे. तुम्ही असं केलं तर तुमचा क्रेडिट युटीलायझेशन रेश्यो वाढीस लागतो. युटीलायझेशन रेश्योमुळे तुमचा क्रेडिट स्कोर देखील बिघडतो. त्यामुळे या गोष्टीची खास काळजी घ्या.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Credit Card Alert 19 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Credit Card Alert(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x