22 November 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पावसामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील वाहतूक जवळपास ठप्प होण्याच्या दिशेने

Western Railway, Central Railway, harbor Railway, Heavy Rain, Mumbai Rain

मुंबई : मुंबई आणि परिसरात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. आजही दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून आज हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक कोलमडली असून रेल्वे रूळही पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूकही कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.

मध्य रेल्वेसोबत पश्चिम रेल्वेलाही या पावसाचा फटका बसला आहे. वसई-विरार आणि नालासोपारा स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी आल्या्मुळे या मार्गावरची सेवा बंद करण्यात आली आहे. या मार्गावरच्या सर्व लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेने खबरदारीचा उपाय म्हणून जलद मार्ग बंद केला असून. चर्चगेट ते बोरिवली मार्गावर सेवा सुरु असून १५-२० मिनीटं गाड्या उशीराने धावत आहेत.

डोंबिवलीला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा फटका बसला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सर्वाधिक फटका डोंबिवली एमआयडीसीतील निवासी भागाला बसला आहे. येथील मिलापनगर, तलाव रोड या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून येथील काही बंगल्यांमध्येही पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. येथील काही सोसायट्यांच्या इलेक्ट्रिक मीटर बॉक्स पर्यन्त पाणी आले आहे. असाच पाऊस पडत राहिला तर परिस्थिती अजून खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकुर्ली रेल्वे यार्ड आणि पूर्वीचे पॉवरहाऊस मध्ये काही ठिकाणी खाडीचे पाणी जमले आहे. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते ही पाण्याखाली गेले असून येथील नांदिवली परिसरातील मठाच्या आवारातील पुरातन वृक्ष कोसळल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. नांदीवली टेकडीवर जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील खाडीलगतच्या चाळींमध्येही पाणी शिरले आहे कल्याण पश्चिमेतील खाडी परिसर असो अथवा पुर्वेतील सखल भाग याठिकाणच्या घरांमध्येही पाणी जायला सुरुवात झाली आहे. पूर्वेतील एफ केबीन वालधुनी या भागालाही पावसाचा फटका बसला आहे.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x