22 November 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

PPF Calculator | PPF योजनेतील बचत मॅच्युअर होऊन देखील व्याज मिळत राहील, या योजनेचे फायदे समजून घ्या - Marathi News

PPF Calculator

PPF Calculator | बऱ्याच व्यक्तींना सुरक्षित आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याकरिता त्याचबरोबर केलेल्या गुंतवणुकीवर चांगले व्याजदर मिळवण्याकरिता एका उत्तम योजनेची गरज असते. तुम्ही सुद्धा जास्त परतावा मिळणारी योजना शोधत असाल तर पीपीएफ स्कीम तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते. पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी.

गुंतवणुकीचे नियम :
पीपीएफ योजनेमध्ये तुम्ही केवळ 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. त्याचबरोबर जास्तीत जास्त 1.5 लाखांची गुंतवणूक करून 7.1% व्याजदराने नफा कमवू शकता. या योजनेचा कार्यकाळ 15 वर्षांचा असून चांगला परतावा हवा असणाऱ्या व्यक्तींनी या योजनेत जरूर पैसे गुंतवण्याचा विचार करावा. यामध्ये तुम्हाला कर सवलतीसह व्याजावर देखील कोणतेही कर द्यावे लागणार नाही. एवढेच नाही तर मॅच्युरिटीवर जी रक्कम तुम्हाला मिळेल ती सुद्धा करमुक्त असेल.

मुदत मॅच्युअर होऊन देखील व्याज मिळत राहील :
पीपीएफ योजनेची सर्वात खास आणि विशेष गोष्ट म्हणजे ही योजना पंधरा वर्षांची असून 15 वर्षानंतर परिपक्व होते. म्हणजेच तुम्ही एकूण 15 वर्षांची गुंतवणूक त्याचबरोबर व्याजाची रक्कम एकत्रित काढून घेऊ शकता. परंतु एखाद्या व्यक्तीने गुंतवणुकीची रक्कम 15 वर्ष उलटून गेल्यावरही खात्यामध्ये ठेवली तर, नियमाप्रमाणे खातेधारकाला व्याज मिळत राहते. समजा तुम्ही अर्धी रक्कम काढून अर्धी रक्कम तशीच ठेवली तर जमा रकमेवर व्याज मिळते. तर, अशाप्रकारे ही पीपीएफ योजना तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरू शकते.

खाते विस्तार :
समजा एखाद्या व्यक्तीला व्याजाचा आणखीन लाभ घ्यायचा असेल तर, 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला पीपीएफ खाते मॅच्युरिटीनंतर देखील वाढवून सुरू ठेवायचे असेल तर मॅच्युरिटी तारखेपासून एका वर्षाच्या आत पोस्टात किंवा बँकेमध्ये जाऊन अर्ज भरून द्यावा लागेल. म्हणजेच तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | PPF Calculator 21 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x