16 April 2025 5:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया

Salman Khan

Salman Khan | बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या बिश्नोई गँगमुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गॅंगने बऱ्याचवेळा जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. एनसीपी नेता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंगने सलमान खानवर निशाना धरला असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत.

12 ऑक्टोबरला बाबा सिद्दिकी यांना जागेवर ठार करण्यात आलं. या सर्व प्रकरणाचा ताबा बिश्नोई गँगने घेतला असल्याची माहितीदेखील समोर आली. आता सलमान खानला बिश्नोई गॅंग संपवल्यावरच शांत बसणार की काय असा प्रश्न सलमानच्या चाहत्यांना पडला आहे.

या प्रकरणानंतर एजन्सीने सलमान खानच्या सुरक्षिततेकडे चांगले लक्ष दिले. त्याचबरोबर सलमान यांना देखील कोणालाच भेटण्याची परवानगी देखील दिली नाहीये. दरम्यान सलमान खानने बिग बॉस 18 ची शूटिंग पूर्ण केली. आता बिश्नोई गॅंगकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान दुबईला रवाना होणार आहे.

या इव्हेंटसाठी हजर असणारे सलमान खान :
सलमान खान यांना सतत जीवे मारण्याची धमकी मिळत असली तरीसुद्धा कामामध्ये कार्यरत राहण्यासाठी ते दुबईला रवाना होणार आहेत. एका वृत्तातून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान एक नावाजलेला इंटरनॅशनल शो ‘दबंग रीलोडेड’ या शो चा भाग बनणार आहेत.

हा इव्हेंट 7 डिसेंबर 2024 रोजी होणार असून, इव्हेंटला अभिनेता सलमान खान, जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, सुनील ग्रोवर आणि जॉर्डी पटेल हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये देखील सलमान खान यांची झलक पाहायला मिळणार. सध्या सिंघम अगेनच्या शूटिंगसाठी सलमान खान व्यस्त असल्याचं समजतंय.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Salman Khan 24 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Salman Khan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या