30 October 2024 9:48 AM
अँप डाउनलोड

Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | शुक्रवारी अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांहून अधिक वाढ (NSE: APOLLO) झाली होती. मात्र नंतर हा शेअर 3.87% वाढून 102.28 रुपयांवर बंद झाला होता. मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आले. दुसऱ्या तिमाहीत अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 140 टक्क्यांनी वाढून 15.9 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 6.6 कोटी रुपये होता. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर 3.87 टक्के वाढून 3.87 रुपयांवर पोहोचला होता. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 3,096 कोटी रुपये होते. शुक्रवारी एकूण १०.१० लाख शेअर्सचे पार पडले.

कंपनीचा EBITDA आणि १ वर्षाचा बीटा (BETA)
दुसऱ्या तिमाहीत अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा EBITDA ३२.८ कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १८.४ कोटी रुपये होता असं आकडेवारी सांगते. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये एक वर्षाचा बीटा ०.९ आहे, जो या कालावधीत अस्थिरता दर्शवितो आहे.

कंपनी टेक्निकल चार्ट
टेक्निकल चार्टच्या दृष्टीने, अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा RSI 45.2 आहे. त्यामुळे हा शेअर ओव्हरबॉट किंवा ओव्हरट्रेडिंग झोनमध्ये ट्रेड करत नसल्याचे संकेत मिळत आहेत. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा शेअर 5 दिवस, 10 दिवसांपेक्षा जास्त परंतु 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी (Low) आहे.

कंपनी ऑर्डरबुक
अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक अत्यंत मजबूत आहे. कंपनीला अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. ज्यामुळे अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे. अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि सीएनए कंपनीकडून २८.७४ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी शेअर 6.72% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 48.02% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1380% परतावा दिला आहे. YTD आधारावर हा शेअर 14.48% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price 26 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x